आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#MeToo : Kiss सीन देण्यासाठी प्रसिद्ध असलेला इमरान हाश्मी म्हणाला - कलाकारांकडून सुरुवातीलाच साइन करुन घ्यायला हवे, म्हणजे भविष्यात कुणी अडचणीत येणार नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः #MeToo अभियानाअंतर्गत बॉलिवूडच्या अभिनेत्री आणि सेलिब्रिटी त्यांच्यासोबत झालेल्या अन्यायाला वाचा फोडत आहेत. या अभिनयामुळे सेलिब्रिटींचा काळा चेहरे जगासमोर येत आहे. तर दुसरीकडे इंटीमेट सीन्स चित्रीत करणे आता फिल्ममेकर्ससाठी डोकेदुखी ठरु लागली आहे. यावर आता अभिनेता इमरान हाश्मी म्हणाला - "हॉलिवूड चित्रपटांप्रमाणेच आपल्याकडेही इंटीमेसी मॅनेजर नियुक्त करायला हवा. म्हणजे एखादी अभिनेत्री आपल्या सहकलाकारासोबत अन्कम्फर्टेबल फिल तर करत नाही ना, याची दक्षता तो घेऊल. याशिवाय प्रोजेक्टसोबत कलाकारांकडून सेक्शुअल क्लॉजवर स्वाक्षरी करुन घ्यायला हवी. जेणेकरुन भविष्यात एखाद्यावर चुकीचा आरोप लागणार नाही." 


उद्देश वाईट नसेल तर इंटीमेट सीन चित्रीत करायला त्रास होणार नाही...
याप्रकरणी निर्माते मुकेश भट म्हणाले - ''भविष्यात जर एखादा कलाकार तुमच्यावर चुकीचा आरोप लावत असेल, तर तो चिंतेचा विषय आहे. इंटीमेट सीन जर स्क्रिप्टची मागणी आहे तर भीतीच्या वातावरणात तो कसा चित्रीत केला जाईल? आलिया माझी मुलगी आहे. तिला चित्रपटात किस करायला सांगितल्यावर ती करते. जर मला ऑब्जेक्शन असेल, तर आम्ही तिला हीरोइन बनवणार नाही. आता राहिला प्रश्न भविष्यात चुकीचा आरोप लावण्याचा तर त्यावर कुणाचेच नियंत्रण नाही. होय, सेक्शुअल हरॅसमेंटच्या प्रकरणात नक्कीच सावधगिरी बाळगायला हवी. इंटीमेसी मॅनेजर हा एक पर्यार होऊ शकतो, पण सेटवर हा अॅडिशनल खर्च होईल. त्यापेक्षा आपण आपला हेतू योग्य ठेवायला हवा. उद्देश वाईट नसेल, तर इंटीमेट सीन चित्रीत करताना कुणीही घाबरणार नाही.'' 

 

स्टंट डायरेक्टर आणि कोरिओग्राफर असू शकतात तर मग इंटीमेसी मॅनेजर का नाही...
हॉलिवूडमध्ये इंटीमेसी डायरेक्टर एलिसिया रोडीज म्हणाली, ''जर चित्रपटांमध्ये फाइट सीनसाठी स्टंट डायरेक्टर आणि कोरिओग्राफर असतात तर मग सेक्शुअल सीन्स चित्रीत करताना इंटीमेसी डायरेक्टर किंवा मॅनेजर का नको...'' हॉलिवूड चित्रपटांमध्ये सेक्शुअल किंवा इंटीमेट सीन्स चित्रीत होत असताना सेटवर इंटीमेसी डायरेक्टर हजर असतो, जो अभिनेता-अभिनेत्रीला सीन्सवेळी योग्य दिशा देण्याचे काम करतो. याशिवाय अभिनेता किंवा अभिनेत्रीसोबत गैरवर्तण होणार नाही याकडेही त्याचे लक्ष असते.

 

बातम्या आणखी आहेत...