आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरावेचकांच्या घरी बुद्धिवंतांच्या खाणी; बारावीच्या परीक्षेत जिद्दीने संपादन केले उत्तम गुण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - सुखवस्तू घरातील मुलांनी परीक्षेत उत्तीर्ण व्हावे यात विशेष काही नाही, पण जिथे अनेक प्रकारची अभावग्रस्तता आहे त्या कुटुंबातील मुलांनी जिद्दीने बारावीच्या परीक्षेत उत्तम गुण संपादन करावेत हे नक्कीच कौतुकास्पद आहे. समाजाच्या तळागाळातील वंचित घटकांपर्यंत शिक्षणाचे वारे अशा सकारात्मकतेने पोहोचणे ही काळाची गरज आहे हे या मुलांनी सिद्ध करून दाखवले आहे. 


पुण्याच्या ऋत्विक सोनवणे या विद्यार्थ्याने बारावीच्या परीक्षेत कला शाखेत साठ टक्के गुण प्राप्त केले आहेत. तो सोलापूरला राहून शिकला आहे. आता पुढच्या शिक्षणासाठी मी पुण्यात येणार आहे आणि मला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा आहे, असे त्याने सांगितले. आईवडील कचरावेचक आहेत. चार भावंडे आहेत, पण सगळी माझ्यापेक्षा लहान आहेत. मीच घरात मोठा आहे, असे ऋत्विक म्हणाला. 

 

अल्प दृष्टी, तरीही मिळवले जिद्दीने ८६%गुण 
प्रबळ इच्छाशक्ती व अात्मविश्वासाच्या जाेरावर अशक्य गाेष्ट शक्य करता येते. जन्मताच अल्प दृष्टी मात्र अधिकारी हाेण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या साेलापुरातील सागर मुळे याने श्रवणशक्तीच्या जाेरावर बारावीच्या (कला शाखा) परीक्षेत ८५.६९ टक्के गुण घेत महाविद्यालयातून त्याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. सागरच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

 

बँकिंग क्षेत्रात करिअर करायचे : अिवनाश गायकवाड 
अविनाश गायकवाड हा औंध येथील इंदिरा वस्तीमध्ये राहणारा मुलगा आहे. त्याने बारावीत वाणिज्य शाखेत ७४ टक्के गुण मिळवले आहेत. दहावीत त्याने ७१ टक्के मिळवले होते. माझे आईवडील शिकलेले नाहीत. ते स्वच्छतेचे काम करतात. मला एक बहीण आहे. ती शिकत आहे. मला बँकिंग क्षेत्रात करिअर करायचे आहे. त्यातच पुढे शिक्षण घेण्याची माझी इच्छा आहे. रोज दोन तास अभ्यास करत होतो, परीक्षेच्या काळात तीन तास अभ्यास केला. 
 

बातम्या आणखी आहेत...