आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Intrusion Of Pak Terrorists Into India Between 1 And 2 Pm, Because Night Vision Camera Does Not Work At That Time Report

अमावस्येला रात्री २ ते ५ दरम्यान भारतात पाक दहशतवाद्यांची घुसखोरी ;कारण या वेळेत नाइट व्हिजन उपकरणे काम करत नाहीत : अहवाल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - पाकिस्तानी दहशतवादी अमावस्येला रात्री भारतात घुसखोरी करतात आणि २०२ किमी लांबीची आंतरराष्ट्रीय सिमा ओलांडण्यासाठी रात्री २ ते ५ ची वेळ निवडतात. कारण, यावेळेत नाईट व्हिजन  उपकरणे व्यवस्थित काम करत नाहीत. याचा नेमका फायदा हे अतिरेकी घेत असतात.

राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. हा अहवाल ३५ पेक्षा जास्त दहशतवादी कारवाया व सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीवर तयार करण्यात आला आहे. कॉल डिटेल्स रेकॉर्डससह व्हीएचएफ सेट्स व पकडले गेलेल्या अतिरेक्यांच्या कबुलीजबाबानंतर   हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. हा अहवाल जम्मू-काश्मीरच्या लोकांसोबतही शेअर करण्यात आला आहे.  यात म्हटले आहे की, पाकिस्तानी दहशतवादी जम्मू -काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यासाठी चंद्राच्या तिथीनुसार आपला कट रचतात. तर जैश-ए-महंमद व लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी आंतरराष्ट्रीय सीमेवर पोहचण्याआधी  जीपीएसने लोकेशन शेअर करतात.  काश्मीरमध्ये अतिरेकी कारवाया करण्यासाठी जीपीएस लोकेशनवरुनच खोऱ्यात असलेल्या हस्तकांच्या संपर्कात असतात, असे स्पष्ट  नमूद केले आहे. 
 

महामार्गावरून काश्मीरात भूमिगत लोकांमार्फत आले जैश व लष्करचे दहशतवादी
एनआयएच्या या अहवालात म्हटले, जैश व लष्करचे दहशतवादी काश्मीरमध्ये घुसण्यासाठी सांबा-जम्मू- उधमपूर व सांबा-मनसा-उधमपूर राष्ट्रीय महामार्गाचा वापर केला. २०१६ व २०१८ मध्ये नागरोटा व झज्जर कोटली येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी याच मार्गाचा वापर केला होता. या दहशतवादी हल्ल्यात २० पेक्षा जास्त सुरक्षा कर्मचारी मृत्यूमुखी पडले होते. अहवालात एक विशेष उल्लेख आहे की, खोऱ्यात काम करणाऱ्या अतिरेकी 
संघटनेच्या सदस्यांनी ट्रकमधून अतिरेक्यांना सांबा, दयाचालक, बेन नदीच्या पुलावरून उचलले.  येथ्ूनच सर्व अतिरेक्यांना घातपात घडवण्यासाठी रवाना करण्यात आले.
 

दहशतवाद्यांनी ७ विविध लोकेशनचा वापर केला
राष्ट्रीय तपास संस्थेच्या अहवालात म्हटले आहे की, बेन नदी व तरणा नदीतून तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -४४ वरून दहशतवादी भारतात मुख्यत्वे करून येतात. जैश व लष्करच्या दहशतवाद्यांनी दहशतवादी कारवायासाठी येथील सात वेगवेगळ्या ठिकाणांचा वापर केला. अहवालात असेही म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्गावरून दहशतवादी घटनास्थळी पोहचण्याची वेळ पहाटेची असते. तेव्हा उजेड फारसा नसतो. १३-१४ मे २०१८ रोजी बीएसएफच्या बटालियनने तरणा नदीजवळ ५ संशयितांच्या हालचालीची नोंद घेतली होती. याच 
दिवशी ५ अन्य दहशतवाद्यांनाही पकडण्यात आले होते.