आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

४-५ महिन्यांत गुंतवणूक संधी, कमीत कमी तीन वर्षांसाठी गुंतवणूक करा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- नववर्षाचे आगमन होताच सर्वांच्या मनात एकच प्रश्न घोळत असतो तो म्हणजे हे वर्ष कसे असेल. माझ्या मते कोणतीही भविष्यवाणी करण्याऐवजी आपल्याला प्रत्येक प्रकारच्या बदलासाठी तयार राहिले पाहिजे. भूतकाळातील विश्लेषण व वर्तमान स्थिती समजून आपण स्वत:ला तयार केले पाहिजे. गेली काही वर्षे पाहिल्यास आर्थिक स्थिती उत्तम राहिली. कंपन्यांच्या उत्पन्नाची आकडेवारी कमकुवत होती, मात्र त्यांचे मूल्य बरेच वाढले. डिसेंबर २०१७ मध्ये मिडकॅप व स्मॉल कॅपसारख्या कंपन्यांचा प्रीमियम लार्ज कॅप शेअरर्सच्या तुलनेत जास्त झाला होता. 

 

आता आपण २०१९ मध्ये प्रवेश केला असताना आर्थिक स्थिती चांगली वाटत आहे. महागाई दर कमी आहे, महसूल व चालू खात्यातील तूटही नियंत्रणात आहे. बँकांचे एनपीए कमी होत आहेत. नव्या गुंतवणुकीने वेग पकडला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत कंपन्यांचे उत्पन्न वाढण्याची आशा आहे. गेल्या वर्षी रुपयाची घसरण व अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत सुदृढता आली. निर्यात आधारित कंपन्यांना याचा फायदाही मिळाला.
 
मूल्याचा विचार करता २०१८ मध्ये मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्ये चांगली सुधारणा झाली. या कंपन्यांचे शेअर्स सध्या लार्ज कॅपच्या तुलनेत प्रीमियमवर नाहीत. त्यामुळे प्रत्येक प्रकारातील कंपन्यांमध्ये गुंतवणुकीच्या संधी आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी पैसा गुंतवण्याआधी योग्य मूल्य पाहावयास हवे. सार्वत्रिक निवडणूक व जागतिक कारणांमुळे ४-५ महिन्यांत गुंतवणुकीच्या संधी मिळू शकतील, अशा कंपन्या त्यांनी निवडल्या पाहिजेत. योग्य मूल्यावर गुंतवणूक करण्यासाठी ३ ते ५ वर्षांत चांगला परतावा मिळू शकतो. कारण दीर्घ मुदतीत कंपन्यांच्या कामगिरीचाच नव्हे तर पीई(प्राइस अर्निंग) गुणोत्तराचा फायदा मिळतो. गुंतवणूकदारांनी कमीत कमी तीन वर्षे गुंतवणुकीचा विचार करावयास हवा. कंपन्यांना आपली परिस्थिती सुधारण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे एक वर्षाच्या कामगिरीवर जास्त लक्ष देऊ नये. 

बातम्या आणखी आहेत...