आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

40 व्या वर्षी सुरू करा बचत; काही वर्षांत मिळेल 5 कोटींचा फंड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तुमचे वय 40 वर्षांच्या आसपास असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही चाळीशीत असल्यासदेखील पुढील वीस वर्षांत 5 कोटींचा फंड जमा करु शकता. या फंडमुळे तुम्ही रिटायरमेंटनंतर तुमच्या सर्व गरजा पूर्ण करु शकतात.  
 
किती करावी लागेल गुंतवणूक
बँकबाजारडॉटकॉमचे अधिकारी आदील शेट्टी यांनी सांगितल्यानुसार, 20 वर्षांत 5 कोटींचा फंड जमा करण्यासाठी तुम्हाला सिस्टिमॅटीक इन्व्हेसमेंट प्लॅन म्हणजेच 'SIP' अकाउंट उघडावे लागेल. त्यात तुम्हाला दरमहिन्याला 20,000 हजारांची गुंतवणूक सुरू करावी लागेल. या गुंतवणूकीवर तुम्हाला दरवर्षी 10 ते 15 टक्के व्याजदर मिळेल. जर तुमच्या गुंतवणूकीवर वर्षाला 15 टक्के व्याजदर मिळत असेल तर वीस वर्षांत तुमच्याकडे जवळपास  5 कोटींचा फंड जमा होतो. तज्ज्ञांच्या मते, इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये जास्त कालावधीपर्यंत पैसे ठेवल्यास त्या रकमेवर तुम्हाला 12 टक्के अधिक  रक्कम परत मिळेल.

 

 
मासिक गुंतवणूक 20,000 रुपये
गुंतवणूकीवर वार्षिक व्याजदर 10%
गुतंवणूकीचा कालावधी 20 वर्षे
अंदाजित परतवा 15 टक्के
एकून जमा झालेला फंड  5 कोटी रुपये


 

बातम्या आणखी आहेत...