आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनचे व्हिडिओ अॅप 'टिकटॉक' विरोधात अमेरिकेत चौकशी सुरू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अमेरिकन सरकारने चीनचे व्हिडिओ अॅप 'टिकटॉक' क(TikTok) विरोधात राष्ट्रीय सुरक्षा तपास सुरु केला आहे. अनेक वृत्तांमध्ये याचा दावा करण्यात आला आहे. वृत्तसंस्था 'रायटर्स', वृत्तपत्र 'न्यूयॉर्क टाइम्स' आणि इतर वृत्तांनुसार अमेरिकेतील परकीय गुंतवणुकीवरिल अंतर-एजन्सी समितीने (सीएफआययूएस) तपास सुरु केला आहे. 

बाइट डान्सने 2017 मध्ये 'म्यूझिकली' खरेदी करून 'टिकटॉक'मध्ये विलीनीकरण केले होते
अनेक खासदारांनी 'टिकटॉक'ची सेन्सॉरशिप आणि त्यातील डेटा संकलनावर प्रश्न उपस्थित केले होते. दरम्यान विशिष्ट प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नसल्याचे वित्त विभागाने म्हटले होते. यादरम्यान 'टिकटॉक'ने सांगितले की, जारी केलेल्या नियामक प्रक्रियेवर भाष्य करू शकत नाही. परंतु अमेरिकन लोकांचा आणि त्याच्या नियामकांचा विश्वास संपादन करणे याला आमचे प्राधान्य आहे. 'टिकटॉक'चे मालक बाइट डान्सने 2017 मध्ये 'म्यूझिकली' विकत घेऊन त्याचे 'टिकटॉक'मध्ये विलीन केले होते. 

बातम्या आणखी आहेत...