आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Investigation Of Jamia Violence Case In The Final Phase, The Union Informed The Court

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जामिया हिंसाचार प्रकरणाची चौकशी अंतिम टप्प्यात, केंद्राची कोर्टात माहिती

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • केंद्राला बाजू मांडण्यासाठी २९ एप्रिलपर्यंत मुदत
  • जामियातील आंदोलनात ६२ पोलिस, १२७ जण जखमी : सरकार

नवी दिल्ली - जामिया हिंसाचार प्रकरणाची चौकशी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात दिली. हा तपास महत्त्वाच्या टप्प्यात आहे. तसेच, या प्रकरणात आणखी मुळाशी गेल्यास काही महत्त्वपूर्ण बाबी हाती लागतील, असे सॉलिसिटर मेहता यांनी मुख्य न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला सांगितले. पोलिसांनी केलेल्या हिंसाचाराविरोधात जामियातील विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणीदरम्यान मेहता बोलत होते. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने  केंद्र सरकारला आणि याचिकाकर्त्यांना पूर्वीच्या आदेशांचे पालन करण्याचे  आणि प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्याची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कॉलिन गोन्साल्व्हीस म्हणाले,  पोलिसांनी केलेल्या निर्दयी मारहाणीत जामिया विद्यापीठातील ९३ विद्यार्थी जखमी झाले आहेत. विद्यार्थ्यांनी सीसीटीव्हीसह  फुटेजच्या आधारे तक्रारी दाखल केल्या आहेत. ग्रंथालयात घुसून तोडफोड आणि मारहाणीची तक्रार विद्यार्थ्यांनी दाखल केली आहे. या सर्व तक्रारींची नोंद पोलिसांनी एफआयआर म्हणून करावी.याला विरोध करताना मेहता म्हणाले, एकदा घटना घडल्यास, अनेक एफआयआर नोंदवले जाऊ शकत नाहीत. एकाच एफआयआरच्या आधारे तपास केला जातो. दुसरीकडे, जर असे असेल तर पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात एकही एफआयआर का नोंदवला जात नाही, असा सवाल गोन्साल्व्हीस यांनी उपस्थित केला. दरम्यान, ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी सांगितले की, मागील सुनावणीच्या वेळेस प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिलेे होते. तोंडी वक्तव्ये पुरेशी होणार नाहीत. जे काही ते म्हणतात ते प्रतिज्ञापत्रात असले पाहिजे. या प्रकरणावरील पुढील सुनावणी २९ एप्रिलला होईल. जामिया परिसरात आक्षेपार्ह घोषणाबाजी
 
मंगळवारी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाजवळ एका जमावाने जोरदार घोषणाबाजी केली. राष्ट्रीय ध्वज हातात घेत, जमावाने जय श्रीराम आणि गोली मारो..गोली मारो अशा घोषणा दिल्या. नागरिकत्व सुधारणा कायद्याचा विरोध करणाऱ्या हाफिज आझमी या विद्यार्थ्याने ही माहिती दिली. तो म्हणाला, सुखदेव विहारच्या दिशेने एक जमाव घोषणाबाजी करत आला. त्यांनी १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ गोली मारोच्या घोषणा दिल्या.जामियातील आंदोलनात ६२ पोलिस, १२७ जण जखमी : सरकार


जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात झालेल्या आंदोलनात ६२ पेक्षा जास्त पोलिस कर्मचारी आणि इतर १२७ जण जखमी झाले असल्याची माहिती सरकारने लोकसभेत दिली. केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार ते विद्यार्थी आणि जमावाकडून सुरू असलेल्या हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी, तसेच सरकारी मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी ते विद्यापीठ परिसरात घुसले होते. तसेच, त्यांनी परिसरातील निरपराध विद्यार्थ्यांचे प्राण वाचवले. “दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमावावर तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते. ते नागरिकत्व सुधारणा कायद्याचा विरोध करताना सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करत असल्याचे निदर्शनास आले होते. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी पंधरा जणांना अटक केली आहे. तर, जामियात ३६ विद्यार्थ्यांसह १२७ जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.