Home | Business | Insurance | investment in mutual fund

फक्त 5 लाखांच्या गुंतवणूकीने व्हाल 44 लाखांचे मालक, जाणून घ्या कुठे लावायचा आहे पैसा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 05, 2018, 06:23 PM IST

जर तुमच्याकडे पैसा आहे आणि तुम्हाला या पैशांची एकाचवेळी गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याकडे अनेक प्रकारचे ऑप्शन आहे.

 • investment in mutual fund

  नवी दिल्ली : जर तुमच्याकडे पैसा आहे आणि तुम्हाला या पैशांची एकाचवेळी गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याकडे अनेक प्रकारचे ऑप्शन आहे. बँक बाजार डॉटकॉमचे सीईओ आदिल शेट्टीनुसार तुम्ही 5 लाख रुपये गुंतवणूक करुन 44 रुपयांचा फंड जमा करु शकतात. यासाठी तुम्हाला 5 लाख रुपये एकाच वेळी इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवावे लागतील. जर तुमची गुंतवणूक 20 वर्षांपर्यंत टिकून राहिली तर तुम्हाला एका वर्षात 11.5 टक्के रिटर्न मिळू शकतो. तुमच्या अकाउंटमध्ये 44 लाख रुपये येतील.

  इक्विटी म्युचुअल फंडने दिले चांगले रिटर्न
  जर तुम्ही एकाचवेळी मोठ्या रक्कमेची गुंतवणूक करु शकत असाल तर तुम्ही इक्विटी म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करु शकता. क्रिसिल एएमएफआय इक्विटी फंड परफॉर्मेंस इंडेक्सने जून, 2017 पर्यंत 10 वर्षांच्या काळावधीत 11.56 टक्के रिटर्न दिले आहेत. दिर्घकाळासाठी इक्विटी म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास फायदा होऊ शकतो.

  डेट म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूकीचे ऑप्शन
  पारंपारिक गुंतवणूकदार जास्त रिस्क घेऊ शकत नाही, त्यांच्यासाठी टेड म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा एक चांगला ऑप्शन आहे. दिर्घ काळ डेट म्युचुअल फंड बँक डिपॉझिटच्या तुलनेत चांगले रिटर्न देऊ शकते. बाजारात डेट म्युचुअल फंड अनेक व्हरायटीजमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये लिक्विड फंडपासून तर लॉग टर्म डेट फंडचा समावेश आहे. क्रिसिल एएमएफआय डेट फंड परफॉर्मेंस इंडेक्स, 2017 नुसार डेट म्युचुअल फंड कॅटेगिरीने गेल्या 10 वर्षांमध्ये 8.59 टक्के एका वर्षाचे रिर्टन दिले आहेत.

  पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा सविस्तर...

 • investment in mutual fund

  मोठी अमाउंट नसेल तर गुंतवणूकीसाठी एसआयपी आहे चांगले ऑप्शन 


  तुमच्याजवळ एकाचवेळी गुंतवणूक करण्यासाठी मोठी रक्कम नसेल तरीही तुम्ही दिर्घकाळात मोठा फंड जमा करु शकता. यासाठी सिस्टमॅटिक इन्वेस्टमेंट प्लान म्हणजेच एसआयपी एक चांगला पर्याय आहे. तुम्ही कमीत कमी 500 रुपयांपासून एसआयपी अकाउंट ओपन करु शकता आणि 500 रुपये म्युचुअल फंड एसआयपीमध्ये गुंतवू शकता. दिर्घकाळानंतर तुम्हाला यामधून मोठा फंड मिळू शकतो. 
   

 • investment in mutual fund

  स्टेप अप एसआयपीमध्ये झपाट्याने वाढेल पैसा 


  जर तुम्हाला 20 किंवा 25 वर्षांच्या काळात मोठा फंड जमा करायचा आहे तर स्टेप अप एसआयपी तुमची मदत करु शकते. स्टेप अप एसआयपीमध्ये तुम्ही वर्षातून आपली गुंतवणूक 10 किंवा 20 टक्क्यांपर्यंत वाढवू शकता. सामान्यतः लोकांचे उत्पन्न दरवर्षी वाढते. अशा वेळी प्रत्येक वर्षी गुंतवणूक वाढवणे सोपे आहे. दिर्घकाळानंतर याचा तुमच्या गुंतवणूकीवर सकारात्मक प्रभाव पडतो. तुमचा फंड झपाट्याने वाढतो. 

   

Trending