आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Investment Options Continue To Fall Despite Government Measures, In Which Case The Advice Of Experts In Shares And Mutual Fund Investments

गुंतवणूक पर्याय सरकारी उपायांनंतरही घसरण कायम, अशा परिस्थितीत शेअर्स व म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी दाेन तज्ज्ञांनी दिलेला सल्ला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात विक्रीच्या अनेक संधी, पुरवठा वाढल्यास मिळेल विकासाला गती - अमित गुप्ता, सहसंस्थापक व सीईओ, ट्रेंडिंग बेल्स...  
काेणत्याही देशाचा शेअर बाजार साधारणत: त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे द्याेतक असताे. शाॅर्ट टर्ममध्ये शेअर बाजारातील सेंटिमेंट आणि मागणीचा पुरवठादारांवर परिणाम हाेऊ शकताेे. परंतु लाँग टर्ममध्ये शेअर बाजार हा भक्कम अशा मूलभूत घटकांच्या आधारावर चालत असताे. एक स्थिर सरकार आर्थिक सुधारणा आणि व्यावसायिक घडामाेडींना चालना देण्यासाठी वेगाने निर्णय घेऊ शकते. असे निर्णय बाजारासाठी सकारात्मक असतात. केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने आर्थिक सुधारणा आणि कर सुधारणांची घाेषणा केली हाेती. अलीकडेच सरकारी बँकांच्या विलीनीकरणाचा सरकारने निर्णय घेतला आहे. असे निर्णय शेअर बाजारावर लवकर आणि व्यापक असा सकारात्मक परिणाम करत असतात. भारतात विक्रीची शक्यता खूप जास्त आहे. येथे केवळ खाद्यान्न उत्पादनांपर्यंत मर्यादित नसून शिक्षण, वीज, वाहन, दूरसंचार, हेल्थकेअरसारखे अनेक उद्याेग आहेत, ज्यामध्ये खूप माेठ्या प्रमाणावर विक्री आहे. ही कंपन्यांना एक चांगली संधी प्रदान करते. कारण भारतात मागणी आणि पुरवठा यात खूप फरक आहे. हा फरक वेगाने कमी करण्यासाठी नवीन आणि प्रभावी तंत्रज्ञानाचा उपयाेग करण्याची गरज आहे. स्वस्त दरात कर्ज मिळाल्यास उद्याेगांच्या उत्पादनात वाढ हाते. त्यामुळे त्यांचा महसूल आणि नफा वाढताे. त्यामुळे देशात नाेकऱ्या वाढण्यास मदत हाेते. शेवटी त्याने मागणी आणि विक्री दाेन्हींना वेग येताे. कंपन्या उत्पन्न वाढल्याची आकडेवारी जाहीर करतात त्या वेळी त्यांच्या शेअरचे मूल्य वाढते आणि त्याचा थेट परिणाम शेअर बाजारावर हाेताे. अमेरिका-चीन यांच्यामध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धाचा भारतीय शेअर बाजारावरच नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेवरही परिणाम हाेत आहे. शाॅर्ट टर्ममध्ये त्याचा शेअर बाजारावर परिणाम हाेईल. परंतु याचा दीर्घ काळामध्ये शेअर बाजारावर किरकाेळ परिणाम हाेईल, असे आमचे मत आहे.

चीनच्या कंपन्या भारतात आल्यास अर्थव्यवस्थेला गती
अहवालानुसार अमेरिका-चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या आपले उत्पादन अन्य देशांमध्ये स्थलांतरित करण्याचा विचार करत आहेत. ही भारतासाठी माेठी संधी निर्माण हाेत आहे. जर या कंपन्यांनी भारतात आपला व्यवसाय स्थलांतरित केला तर देशाच्या अर्थव्यवस्थेवर याचा विस्तृत सकारात्मक परिणाम हाेईल.

शेअर बाजारात चढ-उतार असतानाही एसअायपीतील गुंतवणूक कायम ठेवा - संदीप सिक्का, ईडी व सीईओ, रिलायन्स निप्पॉन लाइफ एएमसी...   
गेल्या काही वर्षांत रिटेल गुंतवणूकदारांनी माेठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे, परंतु त्यांना आपल्या पाेर्टफाेलिओमध्ये नकारात्मक परतावा मिळाला आहे. अर्थव्यवस्थेतील मरगळ, चीन - अमेरिका व्यापारयुद्ध, भाैगाेलिक तणाव, एनबीएफसीचे नगदी संकट यामुळे शेअर बाजारात माेठ्या प्रमाणावर चढ-उतार हाेत आहेत. या कालावधीत भारतीय गुंतवणूकदारांच्या विश्वासाची एक परीक्षा हाेत आहे. काही कालावधीत मासिक सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी)च्या माध्यमातून गुंतवणुकीचा वेग वाढत आहे. काही महिन्यांपासून त्याचा वेग मंदावला आहे. तरीही एसआयपीमधील गुंतवणुकीचे सातत्य मात्र कायम आहे. किरकाेळ गुंतवणूकदारांसाठी हे एक माेठे यश आहे. कारण त्यांचा गुंतवणुकीचा दृष्टिकाेन त्यांची परिपक्वता प्रदर्शित करताे. चढ-उतार हाेत असताना गुंतवणूकदार आपली गुंतवणूक कायम ठेवावी की ती बंद करावी असा विचार करत आहेत. पण तुम्हाला बाजारावर विश्वास असेल तर एसआयपी दीर्घकाळात चांगली रक्कम देऊ शकतात. बाजारातील चढ-उतार असाधारण घटना नाही. स्वस्थ आर्थिक बाजारासाठी त्याकडे वेगळ्या दृष्टीने बघितले जाते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी या चढ-उतारात गुंतवणुकीच्या संधी शाेधत गुंतवणूक कायम ठेवावी, बाजार शाॅर्ट टर्ममध्ये अस्थिर राहू शकताे. पण त्याचा मुकाबला करण्यासाठी एसआयपी एक चांगले माध्यम असू शकते. त्यामुळे तुम्हाला कमी किमतीला अधिक युनिट मिळवण्यासाठी मदत मिळते. गुंतवणुकीचा खर्च अॅव्हरेज करू शकता. बाजारात वाढ झाली तर पाेर्टफाेलिओचे मूल्य वाढते. बाजार चढताना जास्त किंमत देऊन युनिट खरेदीची गरज भासत नाही. जर तुम्ही दर महिन्याला १० हजार रुपये गुंतवत असाल व पहिल्या महिन्यात २० रुपये एनएव्ही असेल तर त्यात तुम्हाला ५०० युनिट मिळतात.

नियमित बचतीतून दीर्घकाळात माेठी रक्कम मिळते
एसआयपी तुम्हाला आर्थिक लक्ष्य साध्य करण्याच्या दृष्टीने मदत करते. दीर्घकाळात तुम्ही या माध्यमातून माेठी रक्कम उभी करू शकता. उदाहरणार्थ -जर तुम्ही दरमहिना ३,००० रुपयांची गुंतवणूक केली तर वर्षाला १२ % रिटर्न मिळेल. ३० वर्षांत १.०६ काेटी रुपयांची रक्कम तुम्ही उभी करू शकता.

- हे लेखकाचे खासगी विचार आहेत. या आधारावरर गुंतवणूक करून नुकसान झाल्यास दिव्य मराठी जबबाबदार नाही .
 

बातम्या आणखी आहेत...