आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या भाग भांडवलात 100 कोटींची जास्त गुंतवणूक; शासनाचा निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या भाग भांडवलात यापूर्वी राज्य शासनाने 100 कोटींची जास्त गुंतवणूक केली होती. त्यावर गेल्या 5 वर्षांपासून राज्य बँकेने राज्य शासनास दरवर्षी 10 टक्क्यांप्रमाणे 10 कोटी रुपयांप्रमाणे लाभांश दिला आहे. या वर्षीचा लाभांश प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर व समिती सदस्य यांनी मंगळवारी (ता.15) मंत्रालयात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे उपस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे सुपूर्द केला. 

 

राज्य शासनास बँकेच्या भाग भांडवल गुंतवणुकीपासून मिळणारा परतावा लक्षात घेता तसेच राज्य शासनाने राज्य बँकेच्या ध्येय व उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी 10 जानेवारीला शासन निर्णयानुसार राज्य बँकेच्या भाग भांडवलामध्ये 100 कोटी रुपयांची जास्त गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे राज्य बँकेच्या भाग भांडवलामध्ये राज्य शासनाचे 200 कोटींचे भाग भांडवल राहणार आहे.

 

जास्त भाग भांडवलाची गुंतवणूक करीत असताना राज्य शासनाने सध्या अडचणीत असलेल्या विदर्भातील नागपूर, वर्धा व बुलडाणा या जिल्हा बँकांच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्हा बँका प्रथमत चालविण्यास घेणेबाबत व त्यानंतर विलिनीकरण करुन घेणेच्या संदर्भात राज्य बँकेस सांगितले आहे. यानुसार राज्य बँकेने आर्थिक अडचणीत असलेल्या जिल्हा बँका चालविण्यास घेण्यासंदर्भात एक कृती आराखडा तयार केला आहे. तो मान्यतेसाठी नाबार्डकडे पाठविला आहे. सदर आराखडयास मंजुरी मिळताच या संदर्भात पुढील धोरण निश्चित करण्यात येईल, असे विद्याधर अनास्कर यांनी सांगितले. राज्य बँकेचा स्वनिधी 3746 कोटी, ठेवी 14,106 कोटी, कर्जे 15,992 कोटी तर बँकेचा एकूण व्यवहार 30,098 कोटी एवढा असल्याचेही अनास्कर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...