आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यातील शेतकऱ्यांना शिवतीर्थावर निमंत्रण, 6000 चौरस फुटांचे व्यासपीठ, 60,000 खुर्च्या, 1 लाख लोकांची व्यवस्था

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मंदार जोशी/महेश जोशी

मुंबई : दादरच्या शिवाजी पार्कवर शपथविधीसाठी सोहळा पाहण्यासाठी तब्बल एक लाखावर लाेक येण्याची शक्यता आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबासह सुमारे ४०० शेतकऱ्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई भव्य व्यासपीठ उभारत आहेत.

राज्याभिषेकाची तयारी

राज्याभिषेकासारखी सोहळ्याची तयारी सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाच्या बाजूला व्यासपीठामागे शिवरायांचा पुतळा व समोर शिवराज्याभिषेकाचे शिल्प असणार आहे. महाराष्ट्राची भव्यता व इतिहास या मंचाद्वारे मांडला जाईल. मंचावर १०० जणांच्या बसण्याची सोय असेल.

मंचावर बळीराजास मान

सेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून उपवास करत ८५ किमी अनवाणी पायाने पंढरपूरला विठ्ठल दर्शनाला गेलेले शेतकरी संजय सावंतांना मंचावर स्थान असेल. सांगलीत त्यांनी उद्धव यांची भेट घेऊन सेनेचा मुख्यमंत्री शपथ घेत असताना मला स्टेजसमोर उभे करा, अशी विनंती केली होती.

२४ तासांत ६ हजार चौरस मीटरचे व्यासपीठ उभारले जात आहे. ६० हजार खुर्च्या टाकण्यात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी सुमारे १ लाख लोक येथील अशी अपेक्षा आहे. तसेच २० ते २५ भव्य एलईडी स्क्रीनही असतील.

मुहूर्त ६.४० चा लाभदायी

- या वेळेत वृषभ लग्न आहे. हे स्थिर लग्न असून या मुहूर्तावर केलेल्या कामाला स्थैर्य लाभते.
- अमृत चौघडी असून चंद्राचा होरा आहे. चंद्राचा होरा हा कार्यात निश्चित विजय देणारा.
- दशम स्थानातील कुंभ राशीचा अधिपती अष्टमात शुक्रासोबत असल्याने नावलौकिक प्राप्त होईल. २०२१ नंतर अंतर्गत कलह शक्य.
- अनंत पांडव गुरूजी, अाैरंगाबाद

शिवसेनेची माहिती

राज्यपालांनी ६.४० ची वेळ दिली. केवळ २२ मिनिटांसाठी त्यांनी वेळ दिला अाहे.