आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइलच्या अतिवापराने आजारांना निमंत्रण; रेडिएशनचे तज्ज्ञ मिलिंद बेंबळकर यांचे मत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - मोबाइलच्या अतिवापरामुळे तसेच परिसरातील मोबाइल टॉवरमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढले आहे. अनेक डॉक्टरांच्या संशोधनानुसार मोबाइल टॉवरच्या रेडिएशनमुळे कर्करोग, स्तनाचा कर्करोग, हृदयविकार आदी आजार उद्भवतात. मोबाइलच्या अतिवापरामुळे डीएनए तुटून फ्री रॅडिकल तयार होतात. इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशातील मोबाइल वापराचे प्रमाण जास्त आहे आणि आजकालच्या टेलिकॉम कंपन्यांच्या विविध डेटा ऑफर्स आणि फ्री कॉलिंगमुळे अलीकडे हे प्रमाण अधिकच वाढले आहे. त्याचा परिणाम सर्व वयोगटांतील व्यक्तींवर झाल्याचे स्पष्ट झाले आहे, असे मत रेडिएशनचे तज्ज्ञ मिलिंद बेंबळकर यांनी व्यक्त केले.


मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने शिवाजीनगर येथील दि इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सच्या फिरोदिया सभागृहात आयोजित “मोबाइल वापराचे परिणाम’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी मायक्रोवेव्ह रेडिएशनचे अभ्यासक सुरेश कर्वे, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष विनय र. र., राजेंद्र सराफ, संजय मालती कमलाकर आदी उपस्थित होते. कर्करोग, नपुंसकता  तसेच डोकेदुखी, थकवा, बधिरपण येणे, यांमुळे २० टक्के तरुण पिढी यामुळे ग्रासली आहे. उंदरांवर केलेल्या प्रयोगातून रेडिएशनचे दुष्परिणाम सिद्ध झाले आहेत. परंतु मोबाइलचा मनुष्यांवर परिणाम होतो, हे सिद्ध नसल्याचे टेलिकॉम कंपन्या सांगतात. त्यामुळे संभ्रम आहे.

 

लहान मुलांना मोबाइल देणे टाळावे
सुरेश कर्वे म्हणाले, मानवी वसाहतीत असलेल्या टॉवरमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे आणि मोबाइलच्या अतिवापराने येत्या दहा वर्षांत कर्करोगाची सुनामी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोबाइलचा वापर बेताने करणे गरजेचे आहे. मोबाइल तसेच इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे “शॉर्ट टर्म युज’साठी आहे. ६ मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोबाइल वापरल्याने हिट वाढीस लागते. त्यामुळे त्याचा जास्त वापर टाळावा. मोबाइलवर बोलताना तो कानापासून दहा मिलिमीटर अंतरावर राहील याची काळजी घ्यावी. पालकांनी मुलांना मोबाइल देणे सहसा टाळावे.

बातम्या आणखी आहेत...