आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - दिल्लीच्या शाहीन बागेत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात सुरू असलेले धरणे व निदर्शनांत एका नवजाताचा मृत्यू झाला. यावरून १० वर्षांच्या झेेन गुणरत्न सदावर्तेने सर्वोच्च न्यायालयास पत्र लिहिले आहे. आग लागलेली असताना १७ लोकांचे प्राण वाचवल्याबद्दल झेनचा शौर्य पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. तिने शाहीन बागेत ४ महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याने आपण दु:खी आहोत असे म्हटले. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांना लिहिलेल्या ५ पानी पत्रात ती म्हणते, या घटनेमुळे एक नागरिक म्हणून मला मोठा मानसिक धक्का बसला आहे. कलम २१ नुसार चार महिन्यांच्या मुलाच्या जगण्याचा अधिकार हिरावून घेतला आहे. तो आईसोबत दररोज निदर्शनांत जात होता. या पत्राला याचिकाही मानले जाऊ शकते. मुले व नवजातांच्या आरोग्यास धोका असताना, त्यांना निदर्शनांत सहभागी करण्यापासून रोखण्यासाठी पोलिस अपयशी ठरले. पोलिसांनी या मुलाच्या मृत्यूच्या कारणांची चौकशी करावी. तिने मृत मुलाचे पिता आरिफ व आई नाझिया तसेच दिल्ली पोलिस व शाहीन बाग आंदोलनाचे संयोजक यांनी कथितदृष्ट्या निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल दोषी ठरवण्याची मागणीही केली आहे. झेनच्या आई-वडिलांनी सांगितले, जेनचा शाहीन बाग आंदोलनास विरोध नाही. परंतु त्या मुलांच्या दु:खाची तिने जाणीव करून दिली आहे. कारण त्यांना आपले दु:ख मांडता येत नाही. हा प्रकार यातना व क्रौर्याचा आहे.
१७ जणांना आगीतून वाचवल्याबद्दल मिळाले अवॉर्ड
१० वर्षांची झेन मुंबईत राहते व डॉन बॉस्को इंटरनॅशनल स्कूल, माटुंगा येथे सातव्या इयत्तेत शिकते. तिला राष्ट्रपतींच्या हस्ते या वर्षी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. झेनने मुंबईतील क्रिस्टल टॉवरला आग लागल्यानंतर १७ लोकांचे प्राण वाचवले होते. झेनच्या शाळेत मुलांना जाळपोळ, भूकंप व इतर नैसर्गिक आपत्तीशी लढा देण्याची प्रात्यक्षिके शिकवली जातात. यासाठी तिला शौर्य पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.