आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटकेनंतर १०६ दिवसांनी चिदंबरम यांना जामीन; तिहारमधून सुटताच घेतली सोनिया गांधी यांची भेट, आज संसदेत जाणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आयएनएक्स मीडियाशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणातही सर्वोच्च न्यायालयाने माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना बुधवारी सशर्त जामीन मंजूर केला.  चिदंबरम यांना ऑगस्टमध्ये अटक झाली होती, १०६ दिवसांनी त्यांना जामीन मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर आनंद व्यक्त करत पी. चिदंबरम यांचे खासदार पुत्र कार्ती चिदंबरम म्हणाले, ते गुरुवारी संसदेत जातील. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टि्वट केले - चिदंबरम यांना तुरुंगात ठेवणे म्हणजे सूड घेण्यासारखे होते. कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला त्याचा आनंद आहे. ते आपले निर्दोषत्व सिद्ध करतील याचा मला विश्वास वाटतो. 

सशर्त जामीन

  • कोर्टाच्या परवानगीनेच परदेशात जाता येईल
  • साक्षीदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न नको
  • आयएनएक्स प्रकरणी माध्यमांना माहिती नको

बातम्या आणखी आहेत...