आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • INX Media Dispute: CBI Will Prove Chidambaram's Allegations In Court? All Information Of The INX Case

सीबीआय चिदंबरम यांच्यावरील आरोप कोर्टात सिद्ध करेल? आयएनएक्स प्रकरणाचा इत्थंभूत वृत्तांत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयएनएक्स मीडिया प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन रद्द केल्यानंतर माजी अर्थमंत्री व माजी गृहमंत्री पी.चिदंबरम २१ ऑगस्टपासून सीबीआयच्या कोठडीत आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. काँग्रेसने त्यास राजकारणाने प्रेरित आणि सुडाची कारवाई ठरवली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयापासून उच्च न्यायालय आणि सर्वाेच्च न्यायालयापर्यंत लढा सुरू आहे. वस्तुत: पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांनी २००७ मध्ये आयएनएक्स् मीडियाचा पायाच घोटाळ्यासाठी रचला होता. कारण,कंपनीला केवळ ४.६२ कोटी रुपयांच्या विदेशी गुंतवणुकीला परवानगी मिळाली होती आणि त्यांनी मागितले ३०५.३६ कोटी रु. म्हणजे मंजूर रकमेपेक्षा तीनशे कोटी जास्त. विना विदेशी गंुतवणूक संवर्धन मंडळा(एफआयपीबी)च्या मंजुरीशिवाय एवढ्या मोठ्या रकमेवर अर्थ मंत्रालयाच्या फायनांशियल इंटेलिजन्स युनिटचे डोके भडकले आणि प्रकरणाची चौकशी सुरू केली. मात्र, यादरम्यान या गुंतवणुकीसाठी एफआयपीबीची मंजुरी घेण्याचा प्रयत्नही मुखर्जी दांपत्यांनी सुरू केला आणि १ नोव्हेंबर २००८ रोजी त्यांच्याकडून परवानगीही मिळाली. कारण, ही परवानगी गुंतवणूक  आल्यानंतर झाली होती. त्यामुळे याची चौकशीही सुर राहिली आणि २०१० मध्ये फेमाच्या उल्लंघनाच्या आरोपाखाली खटला दाखल झाला. असेे असताना सात वर्षे प्रकरण फाइलींत सुरू होते. मात्र, २०१७ मध्ये एअरसेल-मॅक्सिस कराराच्या चौकशीदरम्यान अंमलबजावणी संचालनालयाला काही कागदपत्रे मिळाली त्यात उघड झाले की, आयएनएक्स मीडियाने चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरमशी संबंधित कंपनीला बरेच पैसे ट्रान्सफर केले आहेत. हा पैसा त्याच अवधीत वळवला होता, जेव्हा आयएनएक्स मीडियाला विदेशी गुंतवणुकीची मंजुुरी दिली होती. यानंतर झालेल्या चौकशीत एक-एक करत नवी माहिती समोर येऊ लागली. इंद्राणी मुखर्जी माफीचा साक्षीदार झाल्यानंतर सीबीआयचे हात बळकट झाले आहेत. सीबीआयने आता मनी ट्रेलच्या चौकशीसाठी ५ देशांशी संपर्क केला आहे.  

सूत्रधार कंपनी :  
२००७ मध्ये आकारास आलेली एक  कंपनी. २००९ मध्ये तिचे संस्थापक पीटर आणि इंद्राणीने स्वत:ला कंपनीच्या व्यवस्थापनापासून वेगळे केले. ऑगस्ट २०१० मध्ये कंपनीने नाव बदलून ९ एक्स मीडिया केले व ती झी एंटरटेनमेंटला १६० कोटी रुपयांत विकली.मुख्य पात्रे  

पीटर मुखर्जी 
ब्रिटनमध्ये जन्मलेले भारतीय टीव्ही उद्योगातील एक निवृत्त अधिकारी. १९९७ ते २००७ पर्यंत स्टार इंडियाचे सीईओ होते. २००७ मध्ये आयएनएक्स मीडियाचे चेअरमन आणि मुख्य धोरण अधिकारी झाले. २००९ मध्ये कंपनी सोडली. नोव्हेंबर २०१५ मध्ये शीना बोरा हत्या प्रकरणात अटक झाली. सध्या तुरुंगात आहे.

इंद्राणी मुखर्जी 
माजी एचआर सल्लागार व मीडिया अधिकारी. पीटर मुखर्जीची पत्नी. २००७ मध्ये पीटरसोबत आयएनएक्स मीडियाची सुरुवात केली आणि सीईओ झाली. ऑगस्ट २०१५ मध्ये मुलगी शीना बोराच्या हत्येच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी अटक केली , सध्या तुरुंगात आहे. 

कार्ती चिदंबरम 
पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती शिवगंगाचे खासदार आहेत. मोठे व्यावसायिक आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांत गुप्त भागीदारीच्या आरोपांची चौकशी सुरू आहे. कार्ती आरोप चुकीचे ठरवत आहेत. फेब्रुवारी २०१८ मध्ये सीबीआयने कार्तीला आयएनएक्स मीडिया प्रकरणात अटक केली आहे. सध्या जामीनावर आहे.

का घोटाळा केला
आयएनएक्सची परवागनी मिळाली केवळ ४.६२ कोटी रुपयांच्या विदेशी गुंतवणुकीस. मात्र, मॉरिशियसच्या तीन कंपन्या, डनअर्न इन्व्हेस्टमेंट, एनएसआरपीई आणि न्यू वरनॉन प्रा. लि.ने आयएनएक्समध्ये ३०५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. आयएनएक्स मीडियाने यापैकी २६% रक्कम एफआयपीबीला परवानगीशिवाय आयएनएक्स न्यूजमध्ये गुंतवली. या रकमेस एफआयबीपीची मंजुरी देण्यासाठी हा सर्व घोटाळा करावा लागला.

कधी  कार्तीचे नाव आल
गुन्हा नोंद होण्याच्या ७ वर्षांनंतर एअरसेल-मॅक्सिस करारात अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी कार्तीशी संबंधित अॅडव्हान्टेज स्ट्रॅटेजिक कन्स्लटिंग प्रा. लि.(एएससीपीएल)ची चौकशी करत होते. त्यावेळी आयएनएक्सशी संबंधित काही कागदपत्रे मिळाली. यात संकेत मिळाले की, ज्यावेळी आयएनएक्सला एफआयपीबीची परवागनी दिली होती, त्याच दरम्यान त्यांनी कार्तीशी संबंधित कंपनीला पेमेंट केले होते.

काय आरोप आहेत
इंद्राणी आणि तिचा पती पीटर मुखर्जीवरील आरोपानुसार, त्यांनी तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरमांचे पुत्र कार्ती चिदंबरमसोबत एफआयपीबीची परवानगी प्राप्त करण्यासाठी गुन्हेगारी कट रचला. कार्ती चिदंबरमला सीबीआयने फेब्रुवारी २०१८ मध्ये अटक केली. यानंतर कार्ती सध्या जामिनावर बाहेर आहे. ईडीनेही या प्रकरणात अनेकदा चौकशी केली आहे. पी.चिदंबरम यांचीही ईडीने डिसेंबर २०१८ व जानेवारी २०१९ मध्ये चौकशी केली होती.

कसा आला टर्निंग पॉइंट
तुरुंगात कैद इंद्राणीने मार्च २०१८ मध्ये एका वक्तव्यात सीबीआयसमोर सांगितले की, आयएनएक्स मीडियाच्या बाजूने एफआयपीबीची मंजुरी देण्यासाठी त्यांच्यात व कार्तीत १० लाख डॉलर(७ कोटी रु. )चा करार झाला होता. जुलै २०१९ मध्ये इंद्राणीने न्यायालयात अर्ज देऊन माफीचा साक्षीदार होण्याची विनंती केली आणि संपूर्ण प्रकरण उघड करण्यास तयार असल्याचे सांगितले. यावर न्यायालयाने संमती दिली. येथूनच या प्रकरणाला नवे वळण मिळाले.

चिदंबरम यांची बाजू 
> ज्या कंपन्यांमध्ये पैसा गेल्याचे सांगितले जात आहे, त्यात चिदंबरम आणि कार्ती कधी समभागधारक किंवा संचालक राहिले. सोबत कोणत्याही प्रकरणात सरकारी पैसा समाविष्ट नाही.
>ज्या कंपन्यांवर प्रश्न उपस्थित झााले आहेत, त्या व्यावसायिक चालवत राहिले आणि पैशाची सर्व देवाणघेवाण सामान्य आहे. ही देवाण-घेवाण पूर्णपणे अकांउटेड, ऑडिटेड आहे.
> चिदंबरम यांची संपत्ती आणि देणे सार्वजनिकरित्या उपलब्ध आहे. कारण, ते खासदार आहेत. त्याच्याशिवाय त्यांच्याकडे कोणतीही संपत्ती नाही. 
>सीबीआयने २०१२ आणि २०१७ च्या एफआयआरशिवाय या प्रकरणात अद्याप कोणतेही आरोपपत्र जारी केले नाही, तसेच त्याची स्वत:हून दखल घेतली. याशिवाय भ्रष्टाचाराच्या कथित प्रकरणात पी. चिदंबरमना आणि त्यावेळच्या कोण्या एफआयपीबीच्या अधिकाऱ्यास आरोपी केले आहे.
 

सीबीआयचेे पुरावे
> आयएनएक्सचे एमडी व सीएफओने ४ नोव्हेंबर आणि १६ नोव्हेंबर,२०१६ रोजी दिलेल्या निवेदनात मान्य केले की, त्यांच्या कंपनीचा कार्ती चिदंबरम यांची कंपनी चेस मॅनेजमेंट प्रा.लि.शी करार झाला होता. 
> सीबीआयनुसार, आयएनएक्स मीडियाने एएससीपीएल आणि अन्य कंपन्यांनी जिनिव्हा, अमेरिका आणि सिंगापूर स्थित बँकांद्वारे वाटप केले. या प्रकरणात जप्त कागदपत्रे आणि ई-मेलमध्ये स्पष्ट होते की, पैशाचे वाटप एफआयपीबीच्या मंजुरीसाठी केले.
> सीबीआयच्या दाव्यानुसार, एएससीपीएल आणि अन्य कंपन्यांना दाखवण्यासाठी मीडिया कंटेंट उपलब्ध करणे आणि मार्केट रिसर्चच्या नावावर कन्सल्टन्सीची खोटी बिल देऊन पैसे प्राप्त केले.
> ईडीने सीबीआयला सांगितले की, एएससीपीएलच्या परिसरातून जप्त दस्तऐवांमधील खुलाशानुसार आयएनएक्सने एएससीपीएलला १५ जुलै २००८ रोजी वाटप केले आणि १ नोव्हेंबर, २००८ रोजी आयएनएक्स न्यूजला अर्थ मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली.
> इंद्राणी आणि तिचा पती पीटर मुखर्जीने सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाला दिलेल्या निवेदनात दावा केला की, जेव्हा ते २००६ मध्ये नॉर्थ ब्लॉक कार्यालयात तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना भेटले होते तेव्हा ते आपला मुलगा कार्तीला भेटा म्हणाले व व्यवसायात मदत करण्यास सांगितले.
 

कधी काय झाले
2010 आयडीने आयएनएक्सविरुद्ध फेमा उल्लंघनाचा गुन्हा नोंद केला.
2017
15 मे- सीबीआयने एफआयपीबीच्या परवानगीने घोटाळ्याचा गुन्हा नोंद झाला.
16 जून - गृह मंत्रालयाने कार्तीविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी केली.
10 अॉगस्ट- मद्रास उच्च न्यायालयाने या नोटिसीला स्थगिती दिली.
14 अॉगस्ट- सुप्रीम कोर्टाने मद्रास हाईकोर्टाचा निकाल फिरवला.
16 फेब्रुवारी- कार्तीचे सीए एस. भास्कररमनला अटक केली.
28 फेब्रुवारी- सीबीआयने कार्तीला चेन्नई विमानतळावर अटक केली.
 23 मार्च - कार्तीला जामीन मिळाला.
11 अॉक्टोबर- ईडीने कार्तीची ५४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.
2019 
11 जुलै - इंद्राणी मुखर्जी या प्रकरणात माफीचा साक्षीदार झाली.
20 ऑगस्ट - दिल्ली हायकोर्टाने पी. चिदंबरम यांचा जामीन अर्ज फेटाळला. 
21 ऑगस्ट- सीबीआयने चिदंबरम यांना अटक केली.