आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन तासांच्या कसून चौकशीनंतर पी. चिदंबरम यांना झाली अटक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया मनी लाँडरिंग प्रकरणात बुधवारी दिल्लीच्या तिहार तुरुंगातून अटक केली. ईडीचे तीनसदस्यीय पथक बुधवारी सकाळी सुमारे सव्वाआठ वाजता तिहार तुरुंगात पोहोचले. अधिकाऱ्यांनी दोन तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली.
मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अटकेची कारवाई करण्यात आली. त्यानंतर ईडीने दिल्लीच्या विशेष न्यायालयाकडे त्यांची १४ दिवसांची कोठडी मागितली. न्यायालयाने प्रॉडक्शन वॉरंट जारी करताना म्हटले की, कोठडीबाबतचा निर्णय गुरुवारी घेतला जाईल. गुरुवारीच चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीचा कालावधी संपत आहे. चिदंबरम यांना गुरुवारी ३ वाजेपर्यंत न्यायालयात हजर करावे, असे निर्देश न्यायालयाने तिहार तुरुंगाच्या अधिकाऱ्यांना दिले. चिदंबरम ५ सप्टेंबरपासून तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. चिदंबरम यांनी २००७ मध्ये आयएनएक्स मीडियाला ३०५ कोटी रुपयांच्या विदेशी गुंतवणुकीला परवानगी दिली होती. त्यात घोटाळा केल्याचा आरोप चिदंबरम यांच्यावर आहे.
 
 

चिदंबरम, कार्तीच्या विरोधात लवकरच आरोपपत्र : सीबीआय
सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले की, आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. त्यात चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती यांचे नाव असू शकते. सीबीआयने या प्रकरणात चिदंबरम यांना २१ ऑगस्टला अटक केली होती. त्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या कोठडीची मुदत गुरुवारी संपत आहे.
 
 

बातम्या आणखी आहेत...