आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धाेनीच्या नेतृत्वात 99 वा विजय, 17.2 षटकांत काेलकाता संघावर 7 गड्यांनी मात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - दीपक चाहरच्या  (३/२०) धारदार गाेलदंाजीपाठाेपाठ फाफ डुप्लेसिसच्या (नाबाद ४३) झंझावाती फलंदाजीच्या बळावर चेन्नईच्या किंग्जने आपल्या घरच्या मैदानावर शानदार विजय साकारला. चेन्नई सुपरकिंग्जने मंगळवारी १२ व्या सत्राच्या आयपीएलमध्ये दाेन वेळच्या चॅम्पियन काेलकाता नाइट रायडर्सचा पराभव केला.  गत चॅम्पियन चेन्नई संघाने १७.२ षटकांत सात गड्यांनी सामना जिंकला. 


धाेनीच्या नेतृत्वाखाली टीमचा हा ९९ वा विजय ठरला.  विजयाच्या बळावर चेन्नई संघाने गुणतालिकेत अव्वल  स्थानावर धडक मारली. आता चेन्नईचे सहा सामन्यांत पाच विजयासह १० गुण झाले आहेत. दुसरीकडे काेलकाता संघाची दुसऱ्या  पराभवामुळे गुणतालिकेमध्ये दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. 


आंद्रे रसेलच्या (नाबाद ५०) अर्धशतकाच्या बळावर काेलकाता नाइट रायडर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना चेन्नईसमाेर विजयासाठी १०९ धावांचे टार्गेट ठेवले हाेते. चेन्नईने १७.३ षटकांत तीन गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य सहज गाठले.  यामुळे चेन्नईला पाचव्या विजयाची नाेंद करता आली. संघाच्या विजयासाठी डुप्लेिससने एकाकी झुंज दिली. काेलकात्याचा हा तिसरा निच्चांक स्काेअर ठरला आहे.  तीन वेळच्या चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा आयपीएलच्या  इतिहासामध्ये काेलकाताविरुद्धचा १२ वा विजय ठरला. तसेच १९ व्या सामन्यात हे दाेन्ही संघ आज समाेरासमाेर आले हाेते.  यात चेन्नईने आपले वर्चस्व अबाधित ठेवताना बाजी मारली.  सामन्यात युवा गाेलंदाज दीपक चाहर चमकला. त्याने तीन बळी घेतले. हरभजन सिंगने सामन्यात दाेन गडी बाद केले.