IPL / सहाव्या विजयासह काेलकाता टीम प्ले ऑफच्या शर्यतीत कायम; पंजाबचा पराभव

यजमान किंग्ज इलेव्हन पंजाब टीमने गमावला सलग चाैथा सामना  

वृत्तसंस्था

May 04,2019 09:27:00 AM IST

माेहाली - दाेन वेळच्या चॅम्पियन काेलकाता नाइट रायडर्स संघाने सहाव्या विजयाची नाेंद करून यंदाच्या आयपीएलमधील प्ले ऑफ प्रवेशाच्या आशा कायम ठेवल्या आहेत. काेलकाता संघाने शुक्रवारी लीगमधील आपल्या १३ व्या सामन्यात यजमान किंग्ज इलेव्हन पंजाबचा पराभव केला. काेलकाता संघाने १८ षटकांत सात गड्यांनी सामना जिंकला. यासह काेलकाता संघाने प्ले आॅफच्या शर्यतीमधील आपले आव्हान कायम ठेवले. पंजाबच्या टीमला आपली पराभवाची मालिका खंडित करता आली नाही.


प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १८३ धावा काढल्या. प्रत्युत्तरात काेलकाता संघाने तीन गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य सहज गाठले. सलामीवीर शुभमान गिलने (६५) शानदार अर्धशतकी खेळीच्या बळावर काेलकाता संघासाठी विजयश्री खेचून आणली. त्यामुळे काेलकाता संघाला प्ले आॅफमधील आपल्या आशा कायम ठेवता आल्या. या पराभवाने पंजाबच्या प्ले आॅफच्या आशा धूसर झाल्या. या टीमचे भवितव्य आता दुसऱ्या संघाच्या निकालावर अवलंबून आहे.


शुभमानचा झंझावात : काेलकाता संघाच्या युवा फलंदाज शुभमान गिलने झंझावाती खेळी केली. त्याने नाबाद ६५ धावांची खेळी केली. त्याने आपला सहकारी क्रिस लीनसाेबत संघाला अर्धशतकी भागीदारीची सलामी दिली. त्यांनी पहिल्या गड्यांनी ६२ धावांची भागीदारी रचली. तसेच त्याने कर्णधार उथप्पासाेबत तिसऱ्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी रचली. यासह त्यांनी टीमचा विजय निश्चित केला. त्याने ४९ चेंडूंमध्ये पाच चाैकार आणि तीन षटकारांच्या आधारे नाबाद ६५ धावांची खेळी केली.

X
COMMENT