Home | Business | Business Special | IPL 2019 auction will have 1003 players in list

IPL 2019 च्या ऑक्शनमध्ये असतील 1003 खेळाडू, कोणासाठी किती लागणार बोली कळेल 18 डिसेंबरला

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 07, 2018, 01:07 PM IST

BCCI ने सांगितले यावेळी ऑक्शनमध्ये आहेत 800 असे खेळाडू जे कधीच IPL खेळले नाहीत..

 • IPL 2019 auction will have 1003 players in list

  नवी दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीगच्या 12 व्या पर्वासाठी 1003 खळाडूंनी आपली नावे नोंदविली आहेत. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने बुधवाती सांगितले की हा लिलाव जयपूर येथे 18 डिसेंबरला होणार आहे. BCCI ने सांगितले यावेळी 232 खेळाडूंसह 1003 खेळाडूंची बोली लागणार आहे. यातील 800 खेळाडू असे आहेत जे आत्तापर्यंत IPL मध्ये खेळलेले नाही आणि त्यातील 746 खेळाडू भारतीय आहेत.

  यावर्षी BCCI ने दिली 9 राज्यांना IPL मध्ये खेळण्याची परवानगी..
  यावर्षी लिलावासाठी भारतातील 9 राज्यातील खेळाडूंनी नावे दिली आहेत. यामध्ये अरुणाचल प्रदेश, बिहार, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, उत्तराखंड आणि पुद्दुचेरी या राज्यांचा समावेश आहे. मात्र ऑस्ट्रलियाचे फलंदाज ग्लेन मॅक्सवेल आणि एरॉन फ्रींच हे यावर्षीच्या IPL मध्ये खेळणार नाहीत. क्रिकइन्फोमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार ऑस्ट्रलियामध्ये असलेल्या त्यांच्या व्यस्त कार्यक्रमणामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

 • IPL 2019 auction will have 1003 players in list

  IPL मध्ये वेगवेगळ्या देशातील इतके खेळाडू घेतील भाग..  
  यावर्षी IPL 12 व्या पर्वात ऑस्ट्रेलियाचे 35 खेळाडू, वेस्टइंडीजचे 33, श्रीलंकेचे 28, अफगाणिस्तानचे 28, न्यूझीलंडचे 17, इंग्लंडचे 14 आणि बांगलादेशचे 10 खेळाडू खेळणार आहेत. त्याचप्रमाणे झिम्बाब्वेचे पाच आणि हॉंगकॉंग, आयर्लंड, नेदरलँड आणि अमेरिका यांच्याकडून एक-एक खेळाडू खेळणार आहे. आठ संघांकडे लिलावात बोली लावण्यासाठी 142 कोटी 25 लाख रुपये आहेत. संघांनी लिलावापूर्वीच काही राखीव खेळाडूंना मुक्त केले आणि त्यातील काही मोठी नावे आता समोर आली आहेत. किंग्स इलेव्हन पंजाबने युवराज सिंग तर दिल्ली डेअरडेव्हिल्सने गौतम गंभीर यांना संघातून मुक्त केले.  

   

 • IPL 2019 auction will have 1003 players in list

  राजस्थान रॉयल्सने जयदेव उनादकटला केले होते लॉन्च.. 

  2018 च्या IPL सीझनमध्ये जयदेव उनादकटसाठी 11 कोटी 50 लाख रुपयांची बोली लावल्यानंतर यावर्षी राजस्थान रॉयल्सने त्याला मुक्त केले आहे. सनरायजर्स हैदराबादने विकेटकिपर रिद्धिमान साहा आणि वेस्ट इंडीजने टी-20 चे कॅप्टन कार्लोस ब्रेथवेट यांना संघातून मुक्त केले. 

   

Trending