आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL : महेंद्रसिंग धाेनीच्या झंझावाताने चेन्नई टीमचा दिल्लीवर सुपर विजय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गत चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज संघाने १२ व्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नाेंद केली. पाहुण्या चेन्नई संघाने मंगळवारी स्पर्धेतील  आपल्या दुसऱ्या सामन्यात यजमान दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. चेन्नई संघाने ६ गड्यांनी सामना जिंकला. यासह चेन्नई सुपरकिंग्ज संघाने दाेन विजयांच्या बळावर गुणतालिकेत पुन्हा अव्वल स्थानावर धडक मारली आहे. 


दुसरीकडे यजमान दिल्लीच्या संघाला आपल्या घरच्या मैदानावर पहिल्या पराभवाला सामाेरे जावे लागले. त्यामुळे दिल्लीचा सलग दुसरा सामना जिंकण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स संघाने ६ बाद १४७ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात चेन्नई संघाने चार गड्यांच्या माेबदल्यात विजयश्री खेचून आणली. कर्णधार महेंद्रसिंग धाेनीने (नाबाद ३२) झंझावाती खेळी करून संघाचा विजय निश्चित केला. तसेच शेन वाॅटसन (४४), सुरेश रैना (३०) आणि केदार जाधवनेही (२७) संघाच्या विजयात माेलाचे याेगदान दिले.  चेन्नईचा तिसरा सामना ३१ मार्च राेजी राजस्थान राॅयल्सशी हाेणार आहे.  ३० मार्च राेजी दिल्लीसमाेर काेलकात्याचे आव्हान असेल.

बातम्या आणखी आहेत...