Home | Sports | From The Field | IPL 2019 Mumbai Indians beats Royal Challengers Bangalore by 5 wickets

यजमान मुंबई इंडियन्सकडून काेहलीच्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला नारळ

वृत्तसंस्था | Update - Apr 16, 2019, 10:06 AM IST

सातव्या पराभवाने राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे आव्हान संपुष्टात

  • IPL 2019 Mumbai Indians beats Royal Challengers Bangalore by 5 wickets

    मुंबई - राेहित शर्माच्या नेतृत्वाखाली तीन वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघाने साेमवारी १२ व्या सत्रातील आयपीएलमध्ये पाचव्या विजयाची नाेंद केली. यजमान मुंबई संघाने लीगमधील आपल्या आठव्या सामन्यात विराट काेहलीच्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला. मुंबईने ५ गड्यांनी सामना जिंकला. यामुळे बंगळुरूच्या टीमला सातव्या पराभवाला सामाेरे जावे लागले. त्यामुळे बंगळुरू संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. या विजयाच्या बळावर मुंबई संघाने गुणतालिकेमध्ये तिसऱ्या स्थानावर धडक मारली. आता मुंबईचे १० गुण झाले आहेत. यामुळे दाेन वेळच्या चॅम्पियन काेलकाता संघाची चाैथ्या स्थानावर घसरण झाली.


    प्रथम फलंदाजी करताना विराट काेहलीच्या नेतृत्वाखाली राॅयल चॅलेजर्स बंगळुरू संघाने ७ बाद १७१ धावा काढल्या. प्रत्युत्तरात मुंबईने ५ गड्यांनी सामना जिंकला. बंगळुरू संघाकडून डिव्हिलियर्सने आपला झंझावात कायम ठेवताना सलग दुसऱ्या अर्धशतकाची नाेंद केली. त्याने ५१ चेंडूंचा सामना करताना ६ चाैकार आणि ४ षटकारांसह ७५ धावांची शानदार खेळी केली.


    माेईनची अष्टपैलू खेळी व्यर्थ : बंगळुरूच्या माेईन अलीने अष्टपैलू खेळी केली. त्याने फलंदाजी करताना ५० धावा काढल्या. तसेच गाेलंदाजीत दाेन बळी घेतले.

Trending