आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • IPL 2020 Auction ; Players List Base Price And Complete Players List For IPL 13 Auction News And Updates

लिलावासाठी 332 खेळाडू शॉर्टलिस्ट, 2 कोटींच्या टॉप बेस प्राइसमध्ये एकाही भारतीय क्रिकेटपटूचा समावेश नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2 कोटींच्या टॉप बेस प्राइसमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दोन खेळाडूंना स्थान, 19 डिसेंबर रोजी कोलकाता येथे खेळाडूंचा लिलाव

स्पोर्ट डेस्क - आयपीएल 2020 साठीच्या खेळाडूंचा लिलाव 19 डिसेंबर रोजी कोलकाता येथे होणार आहे. ईएसपीएनक्रिकइन्फोच्या मते, या लिलावासाठी 971 खेळाडूंनी नोंदणी केली होती, त्यातील 332 खेळाडूंना शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. दोन कोटींच्या टॉप बेस किंमतीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेल आणि पॅट कमिन्ससह दक्षिण आफ्रिकेचा ऑलराउंडर क्रिस मॉरिसला स्थान देण्यात आले आहे. दरम्यान या बेस किंमतीमध्ये एकही भारतीय खेळाडू नाही. रॉबिन उथप्पा भारताचा टॉप बेस प्राइस खेळाडू आहे. त्याचा 1.5 कोटींच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. 
गुरुवारी संध्याकाळपर्यंत खेळाडूंची संपूर्ण यादी आयपीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर जारी केली जाऊ शकते. शॉर्टलिस्ट केलेल्या खेळाडूंमध्ये 24 नवीन खेळाडू आहेत. फ्रँचायजीनेच त्यांची नावे प्रस्तावित केली आहेत. आयपीएलच्या मागील हंगामात 8.4 कोटींमध्ये विकला गेलेला वेगवान गोलंदाज जयदेव उनादकटला 1 कोटीच्या बेस प्राइसमध्ये स्थान देण्यात आले आहे. 

लिलावात प्रथम फलंदाजांवर बोली लावण्यात येणार आहे


लिलावात प्रथम फलंदाजांवर बोली लागणार आहे. यानंतर ऑलराउंडर, यष्टीरक्षक-फलंदाज, वेगवान गोलंदाज आणि शेवटी फिरकीपटूंवर बोली लागणार आहे. यानंतर प्रथम कॅप्ड आणि नंतर अनकॅप्ड खेळाडूंचा लिलाव होईल. एकूण 73 खेळाडूंची जागा रिक्त आहे. यापैकी 29 जागा परदेशी खेळाडूंसाठी राखीव आहेत.