• IPL 2020 Player Auctions; 186 Indian players, 143 overseas players to go under the hammer

आयपीएल 2020 / 19 डिसेंबर रोजी 12 देशांतील 332 खेळाडूंवर लागणार बोली, यात सर्वाधिक 186 भारतीय; प्रथमच दुपारी होणार लिलाव

  • 2 बेस प्राइजमध्ये 7 पैकी 4 ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा समावेश, एकाही भारतीय खेळाडूला स्थान नाही
  • 1.5 कोटीच्या बेस प्राइजमध्ये 10 खेळाडू, यात भारताच्या फक्त रॉबिन उथप्पाचा समावेश 

वृत्तसंस्था

Dec 13,2019 02:57:00 PM IST

स्पोर्ट डेस्क - आयपीएल 2020 साठी होणाऱ्या लिलावासाठी 332 खेळाडूंची अंतिम यादी जारी केली आहे. 19 डिसेंबर रोजी कोलकाता येथे दुपारी 3:30 वाजेपासून लिलावाची प्रक्रिया सुरु केली जाईल. आयपीएलमध्ये प्रथमच सकाळऐवजी दुपारी लिलाव होणार आहे. टीव्हीचा प्राइम टाइम स्लॉट लक्षात ठेवून असे करण्यात आले आहे. या लिलावासाठी 997 खेळाडूंनी नोंदणी केली होती, पैकी 332 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.


या यादीत भारताचे 186, परदेशातली 143 आणि 3 आयसीसीचे असोसिट सदस्य खेळाडू आहेत. यावेळी अमेरिका आणि स्कॉटलँडचे खेळाडू पहिल्यांदा लिलावात सहभागी होणार आहेत. अमेरिकेचा अली खान आणि स्कॉटलंडचा जॉर्ज मुन्सी यांवर फ्रँचायझी बोली लावू शकतात.


1 कोटीच्या बेस प्राइजमध्ये पीयूष, युसूफ आणि उनादकटचा समावेश


2 कोटीच्या टॉप बेस प्राइजमध्ये एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाहीये. तर 1.5 कोटीच्या बेस प्राइजमध्ये रॉबिन उथप्पा या एका भारतीयाचा समावेश करण्यात आलेला आहे. तर 1 कोटीच्या यादीत पीयूष चावला, युसूफ पठाण आणि जयदेव उनादकट यांना स्थान देण्यात आले आहे. मागील हंगामात उनादकट वर 8.4 कोटींमध्ये बोली लागली होती. त्यावेळी त्याची बेस प्राइज 1.5 कोटी होती.


लिलावात 134 कॅप्ड खेळाडूंची बोली लागेल

बेस प्राइस (रुपयांत) एकूण खेळाडू भारतीय परेदशी
2 कोटी 7 00 7
1.5 कोटी 10 1 9
1 करोड़ 23 3 20
75 लाख 16 00 16
50 लाख 78 9 69

लिलावात 198 अनकॅप्ड खेळाडूंचा देखील समावेश

बेस प्राइस (रुपयांत) एकूण खेळाडू भारतीय परदेशी
40 लाख 7 1 6
30 लाख 8 5 3
20 लाख 183 167 16
X
COMMENT