आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजिंक्य रहाणे आता आयपीएलसाठी दिल्ली कॅपिटल्स संघामध्ये दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील सत्रात दिल्ली कॅपिटल्स टीमकडून खेळताना दिसेल. रहाणे आतापर्यंत राजस्थान रॉयल्सचा भाग होता. तो उपकर्णधारदेखील होता. रॉयल्ससोबत रहाणेने आपल्या करिअरची सुरुवात केली होती आणि सलग या संघाचा सदस्य होता. मध्ये दोन वर्षे तो जेव्हा रॉयल्सवर बंदी आली, तेव्हा रहाणे रायझिंग पुणे सुपरजायंटकडून खेळला. त्याला चार कोटी रुपयांमध्ये राजस्थानने दिल्लीकडे सोपवले. रहाणेने आयपीएलच्या १४० सामन्यांत ३२.९३ च्या सरासरी आणि १२१.९२ च्या स्ट्राइक रेटने धावा काढल्या. त्याच्यासह दिल्ली कॅपिटल्सचा स्पिनर मयंक मार्कंडेय आणि राहुल तेवतिया राजस्थान रॉयल्समध्ये सहभागी झाले. आयपीएल २०२० साठी ट्रेड विंडोचा गुरुवारी अखेरचा दिवस होता. आता कोणताही खेळाडू बदली होऊ शकत नाही.