Home | Sports | From The Field | IPL Final: Dhoni's runout upset many fans, learn what the rules tell

IPL Final : धोनीच्या रनआऊटवर अनेक चाहते नाराज, जाणून घ्या काय सांगतात नियम

दिव्य मराठी | Update - May 14, 2019, 02:31 PM IST

आयपीएल फायनल सामन्यात धोनी रनआऊट होता की नाही? जाणून घ्या नियम

 • IPL Final: Dhoni's runout upset many fans, learn what the rules tell


  नवी दिल्ली- यंदाच्या आयपीएल (IPL)मध्ये पुन्हा एकदा अंपायरच्या निर्णयामुळे प्रश्न उपस्थित होत आहेत. अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एम.एस.धोनीला पंचाने बाद करार दिले. त्यामुळे पंचाच्या या निर्णयावर चेन्नई आणि क्रिकेट चाहते आपली नाराजी व्यक्त करत आहेत. काही जणांनी धोनीला ''बेनिफिट ऑफ डाऊटचा'' पंचानी फायदा द्यायला पाहिजे होता असे मत व्यक्त केले.

  काय आहे प्रकरण
  150 धावांचा पाठलाग करताना सीएसकेची सुरूवात चांगली झाली. त्यांनी 12.3 षटकामध्ये 3 विकेटस् गमावून 81 धावा केल्या होत्या. यानंतर धोनीने संथ खेळी करत 8 चेंडूवर 2 धावा काढल्या. पण हार्दिक पांड्याने टाकलेला शॉर्ट बॉल शेन वॉटसनने स्क्वेअर लेगकडे मारला, तेथे असलेल्या मलिंगाने नॉन स्ट्राइकरकडे थ्रो फेकला. पण विकेट्स जवळ असलेल्या पांड्याला थ्रो पकडता आला नाही. तेव्हा धोनी दुसरा रन घेण्यासाठी पळला. तिकडे, ईशान किशनने डायरेक्ट थ्रो फेकला आणि बॉल स्टंप्सला लागला. यानंतर थर्ड अंपायरने धोनीला बाद करार दिले.


  काय आहे वादाचे कारण
  या वादाचे दोन मुख्य कारणे आहेत. पहिला म्हणजे एका अँगलमधून धोनी क्रिजमध्ये पोहचलेला दिसत आहेत तर दुसरे कारण आहे 'बेनिफिट ऑफ डाऊट'. क्रिकेट प्रेमीचे असे म्हणने आहे की, पंचांनी बेनिफिट ऑफ डाउटचा फायदा धोनीला द्यायला पाहिजे होता.

  काय आहे नियम
  आयसीसीच्या नियमानुसार, स्टंप्सवरील बेल्स उडण्यापुर्वी बॅटचा काही भाग क्रिजमध्ये असायला हवा. धोनीची बॅट एका अँगलने या नियमात बसतो पण दुसऱ्या अँगलमध्ये तो क्रिजपासून दूर दिसत आहे. तसेच बेनिफिट ऑफ डाउटचा निर्णय सर्वस्वी अंपायरवर अवलंबून असतो. आणि हा निर्णय तेव्हाच लागू होतो जेव्हा कोणत्याच अँगलने प्रकरण स्पष्ट दिसत नसेल. यावेळी अंपायरला धोनी एक अँगलने क्रिजच्या बाहेर दिसत होता. म्हणून त्याला आऊट देण्यात आले.

Trending