IPL / मुंबईने सुपर ओव्हरमध्ये जिंकला रंगतदार सामना, प्ले ऑफमध्ये प्रवेश 

मुंबई इंडियन्स टीमचा आठवा विजय; हैदराबादने गमावला सातवा सामना

वृत्तसंस्था

May 03,2019 10:46:00 AM IST

मुंबई - तीन वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघाने गुरुवारी १२ व्या सत्राच्या आयपीएलच्या प्ले आॅफमधील आपला प्रवेश निश्चित केला. मुंबईने घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. हार्दिक पांड्या (७) आणि पाेलार्डने (२) तुफानी फटकेबाजी करून मुंबईला सुपर विजय मिळवून दिला. यासह मुंबईने आठव्या विजयाची नाेंद केली. हैदराबादचा हा सातवा पराभव ठरला आहे. मनीष पांडेने (७१) लीगमधील तिसरे वेगवान अर्धशतक ठाेकले. मात्र, पराभवाने ते व्यर्थ गेले.


प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ५ बाद १६२ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात हैदराबादने ६ बाद १६२ धावा काढल्याने सामना टाय झाला. त्यानंतर सुपर आेव्हरमध्ये हैदराबादने २ बाद ८ धावा काढल्या. प्रत्युत्तरात मुंबईने बिनबाद ९ धावा काढून सामना जिंकला.
कृणाल, हार्दिक चमकले : मुंबईकडून कृणाल आणि हार्दिक हे दाेघेे चमकले. त्यांनी प्रत्येकी दाेन व बुमराहनेही दाेन गडी बाद केले.
डिकाॅकचे शानदार अर्धशतक : मुंबईच्या डिकाॅकने माेलाचे याेगदान दिले. त्याने ५८ चेंडूंत सहा चाैकार व २ षटकारांसह ६९ धावा काढल्या.


हार्दिकचा विजयी षटकार : तीन सुपर आेव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद संघाने चार चेंडूंमध्ये ८ धावा काढल्या. बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर दाेन धावा घेण्याच्या प्रयत्नात हैदराबादच्या मनीष पांंडे धावबाद झाला. त्यानंतर गुप्टिलने दुसऱ्या चेंडूवर एक धावा घेतली. तसेच तिसऱ्या चेंडुवर नबीने षटकार मारला. मात्र,त्याला चाैथ्याच चेंडूवर बुमराहने बाद केले. यासह हैदराबादने २ बाद ८ धावा काढल्या. प्रत्युत्तरात मुंबईकडून हार्दिकने रशिदच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. दुसऱ्या चेंडूवर एक धावा घेतली. तिसऱ्या चेंडुूवर पाेलार्डने दाेन धावा काढून मुंबईला विजय मिळवून दिला.

X
COMMENT