आयपीएल : पहिल्यांदाच एकाच टीमच्या सलामीवीरांची शतकी खेळी; सनरायझर्स हैदरबाद संघाचा लीगमधील आतापर्यंतचा माेठा विजय

वृत्तसंस्था

Apr 01,2019 09:27:00 AM IST

हैदराबाद - सामनावीर जाॅनी बैयरस्ट्राे (११४) अाणि डेव्हिड वाॅर्नरच्या (नाबाद १००) शतकांपाठाेपाठ नबी (४/११)-संदीप शर्माने (३/१९) केलेल्या धारदार गाेलंदाजीच्या बळावर यजमान सनरायझर्स हैदराबादने यंदा अायपीएलमध्ये सर्वात माेठ्या विजयाची नाेंद केली. हैदराबाद संघाने रविवारी घरच्या मैदानावर राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर ११८ धावांनी मात केली. हैदराबादचा अायपीएलच्या करिअरमधील हा सर्वात विजय नाेंदवला गेला. बंगळुरूचा हा सलग तिसरा पराभव ठरला. अायपीएलच्या इतिहासात मध्ये पहिल्यांदा एकाच टीमच्या दाेन सलामीवीरांची शतकी खेळी केली. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २ बाद २३१ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात बंगळुरू संघाने ११३ धावात गाशा गुंडाळला.

सर्वाधिक शतकांत दुसरा
सनरायझर्स हैदराबाद संघाच्या सलामीवीर डेव्हिड वाॅर्नरने (१००) शानदार शतकी खेळी केली. त्याने ५५ चेंडूंत नाबाद १०० धावा काढल्या. यात प्रत्येकी पाच षटकार आणि चाैकारांचा समावेश आहे. यासह त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकांच्या यादीमध्ये दुसरे स्थान गाठले. त्याच्या नावे हे चाैथे शतक नाेंद झाले. यामध्ये स्फाेटक फलंदाज ग्रेल हा सर्वाधिक ६ शतकांसह अव्वल स्थानावर आहे.

X
COMMENT