आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनी ठरला तब्बल 200 षटकार मारणारा पहिला भारतीय, आयपीएलमध्ये 4 हजार धावा करणारा पहिला कर्णधार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट डेस्क- चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आयपीएलमध्ये 200 षटकार मारणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. धोनीने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरूद्ध रविवारी खेळलेल्या सामन्यात हा पल्ला गाठला आहे. धोनीने त्याच्या 184 सामन्यात 203 षटकारांचा पल्ला पार गाठला आहे. या सामन्यात धोनीने नाबाद 84 धावांच्या खेळी खेळली. फक्त 200 षटकारच नाही तर धोनीने कर्णधार म्हणून 4000 धावा पुर्ण केल्या आहेत. ही धावसंख्या गाठणारा तो पहिला कर्णधार आहे. धोनीने 166 सामन्यामध्ये कप्तानी केली आहे, यात 4040 धावा केल्या आहेत.
 


ख्रिस गेल 30 षटकार मारणारा एकमेव फलंदाज 
सर्वात जास्त षटकार मारणाऱ्यांच्या यादित धोनी तिसऱ्या स्थानावर आहे. किंग्स इलेव्हन पंजाबच्या ख्रिस गेलने 121 सामन्यामध्ये सर्वात जास्त 323 आणि बंगळुरू संघाचा फलंदाज एबी डिव्हिलअयर्सने 150 सामन्यामध्ये 204 षटकार लगावले आहेत.

 

बंगळुरू विरूद्ध झालेल्या सामन्यात धोनी नाबाद राहिला. रन चेज करताना त्याची ही चौथी अशी पारी आहे, ज्यामध्ये नाबाद राहून सुद्धा टिमला पराभव पत्कारावा लागला. मागील वर्षी 2018 मध्ये पंजाब विरूद्ध धोनीने 44 चेंडूत 79 धावा केल्या होत्या, पण चेन्नईला सामना गमवावा लागला होता. बंगळुरू विरूद्ध धोनीने उमेश यादवच्या शेवटच्या षटकारात 24 धावा ठोकल्या, परंतू चेन्नईला एका रनाने पराभव स्वीकारावा लागला. धोनीने या इनिंगमध्ये 5 चौकार आणि 7 षटकार लगावले.


धोनीने आतापर्यंत 166 सामन्यामध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. यामध्ये 101 सामन्यात त्याला विजय मिळवता आला आहे, तर 65 सामन्या त्याला पराभावाचा सामना करावा लागला आहे. धोनी या आयपीएल टूर्नामेंटमध्ये 100 सामने जिंकणारा पहिला कर्णधार आहे. चेन्नईच्या कर्णधारपदी असताना त्याने 154 सामन्यांपैकी 94 सामने जिंकले आहेत. धोनीने 14 सामन्यामध्ये पुणे सुपरजाएंट्सची कप्तानी केली आहे.


 

बातम्या आणखी आहेत...