आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसऱ्या सहामाहीत आयपीओ बाजाराने वेग पकडला, ५ आयपीओ ५० पटीपेक्षा जास्त सबस्क्राइब, १५ हजार कोटींचे प्रस्ताव येतील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एसबीआय कार्ड, एचडीबी आणि यूटीआय अॅसेटच्या गुंतवणूकदारांचे लक्ष

प्रशांत मिश्र

नवी दिल्ली- या वर्षी बाजारात सूचीबद्ध झालेल्या १४ आयपीओपैकी १३ नी सकारात्मक परतावा दिला. ५ आयपीओ तर ५० पटीपेक्षा जास्त सबस्क्राइब झाले. ४ डिसेंबरला बंद झालेल्या उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचा आयपीओ १६५ पट जास्त घेतला गेला. गेल्या महिन्यात आलेला सीएसबी बँकेचा आयपीओ ८७ पट जास्त घेतला गेला. यासोबत ५०% पेक्षा जास्त प्रीमियमसह लिस्ट झाला. गुंतवणूकदारांनी या दोन बँकांत गुंतवणूक केली. सेबीचे चेअरमन अजय त्यागी यांच्यानुसार, दुसऱ्या सहामाहीत आयपीओ बाजारपेठेत तेजी आली. पहिल्या सहामाहीत आयएलअँडएफएसमुळे बाजार धारणा कमकुवत होती. आता त्यात वेगाने सुधारणा होत आहे. येत्या महिन्यांत काही बळकट कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत.


एसबीआय कार्ड, एचडीबी आणि यूटीआय अॅसेट मॅनेजमेंटसारख्या कंपन्यांच्या आयपीओवर लक्ष असेल. आगामी दिवसांत १५ हजार कोटी मूल्याचे आयपीओ येणार आहेत. बँकिंग क्षेत्रातील वाईट स्थितीतही गुंतवणूकदारांनी या आयपीओत गुंतवणूक केली एसबीआय कार्ड

आयपीओ साइज-8000 कोटी
 

मोठे समभागधारक- एसबीआय 74% शेअर, 
 
इन्व्हेस्टमेंट बँकर-अॅक्सिस कॅपिटल, बीओए, एचएसबीसी नोमुरा, कोटक, एसबी कॅप.
95 लाख ग्राहकांसह दुसरी मोठी कार्ड कंपनी.


बाजार हिस्सेदारी 17.7%.
2018-19 मध्ये कंपनीच्या ग्राहकांची संख्येत 32 टक्के वाढ झाली आहे.
चालू वित्त वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कंपनीचा निव्वळ नफा 92 टक्के वाढला.
एचडीबी फायनान्शियल   
आयपीओ साइज-8000 कोटी 
मोठे समभागधारक-एचडीएफसी बँक 
इन्व्हेस्टमेंट बँकर- बीओए, मेरिल लिंच, मोर्गन स्टेनली
एनबीएफसी सेक्टरच्या सर्वांत बळकट कंपन्यांपैकी एक.
लाँग टर्म डेटमध्ये कंपनीची एएए रेटिंग.
ग्रे मार्केटमध्ये कंपनीचे मूल्य 80,000 कोटी.
ग्रे मार्केटमध्ये कंपनीच्या एका समभागाचे मूल्यांकन 1000 ते1050 रुपयांचे.
यूटीआयअॅसेट मॅनेजमेंट
आयपीओ साइज - 1200 कोटी रुपये, मोजर समभागधारक - एसबीआय, एलआयसी, बँेक ऑफ बडोदा, पीएनबी.


या चार कंपन्यांपैकी प्रत्येकी एकीकडे यूटीआयचे 25 -25 टक्के समभाग आहेत.
समभागधारक 30 टक्के संयुक्त हिस्सेदारी विकतील.


यूटीआयच्या देशात 150 शाखा आहेत. 1 कोटींहून जास्त क्लायंट बेस आहे.

बर्गर किंग इंडिया 
 
आयपीओ साइज-1000 कोटी 
मोठे समभागधारक-एव्हरस्टोन कॅपिटल, इन्व्हेस्टमेंट बँकर-एडलवाइज, कोटक, सीएलएसए.
बर्गर किंग भारतात वेगाने वाढणारी रेस्तराँ चेन आहे. मॅकडोनाल्डशी स्पर्धा.प्रवर्तक ६ कोटी समभाग विकतील. 
देशातील 47 शहरांत कंपनीच 202 आउटलेट आहेत.रेल टेल 
 
आयपीओ साइज -300 कोटी मोठे समभागधारक-सरकार
रेल टेल टेलीकॉम पायाभूत सुविधा देणारी देशातील मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे.
रेल्वे रुळासह ऑप्टिक फायबर नेटवर्कही त्यांच्याकडे आहे.
सरकार 25% भाग आयपीओद्वारे विकेल.
रेल टेल मिनी रत्न पीएसयू.बजाज एनर्जी 
 
आयपीओ साइज- 5450 कोटी मोठे समभाग धारक- बजाज पावर व्हेंचर 
ही बजाज ग्रुपशी संबंधित कंपनी आहे.
सेबीकडून आयपीओला परवानगी मिळाली. 
कंपनीची एकूण 2430 मेगावॅटची क्षमता.
बजाज एनर्जीकडे 90 - 90 मेगावॅटचे पाच चालू प्रकल्प.गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात  
 
कंपनीच्या आयपीओत पैसा गुंतवताना प्रवर्तकांचे ट्रॅक रेकॉर्ड, कंपनीची वित्तीय स्थिती, बुक व्हॅल्यू, बाजार मूल्य, ईपीओ मूल्य, ऑडिटरची पात्रता आणि विकासाची शक्यता आदी बाबींवर लक्ष देणे आवश्यक आहे.आयपीओ ओव्हर सबस्क्राइब होणे म्हणजे? 
 
कंपनी जेवढे समभाग प्रस्ताव देते त्यापेक्षा जास्त समभागांसाठी बोली येणे. एखादी कंपनी आयपीओमध्ये एक लाख शेअर्सद्वारे पैसा गुंतवत आहे. मात्र, बोली पाच लाख शेअर्ससाठी आली. याचा अर्थ आयपीओ ५ पट सबस्क्राइब झाला.

बातम्या आणखी आहेत...