आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करत आयपीएस अधिकाऱ्यांनी दिला नोकरीचा राजीनामा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - लोकसभेनंतर राज्यसभेतही नागरिकत्व संशोधन विधेयकाला बुधवारी मंजूरी मिळाली. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्य पोलीस दलातील आयपीएस अधिकारी अब्दूल रहमान यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या निषेधार्थ तडकाफडकी राजीनामा दिला आहे. रहमान यांनी आपल्या ट्विटरवरून ही माहिती दिली.  हे विधेयक भारताच्या धार्मिक बहुलतेविरूद्ध आहे. मी सर्व न्यायप्रेमी लोकांना विनंती करतो की लोकशाही पद्धतीने या विधेयकास विरोध करा. हे घटनेच्या मूलभूत वैशिष्ट्याविरूद्ध चालले आहे. असे ट्विट आयपीएस अधिकारी रहमान यांनी केले आहे. 

मोदी सरकारने विरोधी पक्षाचे वर्चस्व धुडकावून लावत शरणार्थींसाठीचे नागरिकत्व संशोधन विधेयक राज्यसभेत मंजूर करून घेतले. मतदानावेळी शिवसेनेने सभात्याग केला. बिजू जनता दल, अद्रमुक, संयुक्‍त जद, वायएसआर काँग्रेस, टीडीपी आदींनी विधेयकाच्या बाजूने मतदान केले तर, तृणमूल, टीआरएस, द्रमुक, सपा, माकप, भाकप, राष्ट्रवादी यांनी विधेयकाला विरोध केला.