आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएस भाग्यश्री नवटाकेंचे वादग्रस्त वक्तव्य, एसपींकडून नवटाकेंच्या चौकशीचे आदेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - एका समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य असलेली माजलगाव येथील उपविभागीय पोलिस अधिकारी भाग्यश्री नवटाके यांची व्हिडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे. दरम्यान, याबाबत पोलिस अधीक्षकांकडे लेखी तक्रार करण्यात अाल्यानंतर पोलिस अधीक्षकांकडून नवटाके यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

 

माजलगाव येथील उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून पदभार सांभाळणाऱ्या सहायक पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटाके यांची काही दिवसांपूर्वीची एक व्हिडिओ क्लिप सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे. एका समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य करत असताना यामध्ये नवटाके दिसत आहेत. दरम्यान, याप्रकरणी माजलगाव येथील बाबूराव पोटभरे यांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करत नवटाके यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंद करावा, अशी मागणी केली होती. 

 

अन्यथा न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा असल्याचे सांगितले होते. दरम्यान, सध्या जिल्हा पोलिस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी विशेष पोलिस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल हे जिल्ह्यात आहेत. रविवारी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. 

 

या वेळी त्यांना नवटाके यांच्या वक्तव्याविषयी विचारले असता आपण ही क्लिप पाहिली नसून त्याबाबत आताच बोलता येणार नाही असे सांगितले. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे हे चौकशी

 

कोण आहेत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाग्यश्री नवटाके 
आयपीएस असलेल्या भाग्यश्री नवटाके या सहायक पोलिस अधीक्षक असून सध्या त्या माजलगावच्या उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. माजलगावातील अवैध धंद्यांना चाप लावून आणि आपल्या दबंग कार्यशैलीमुळे त्या ओळखल्या जातात. लेडी सिंघम अशी त्यांची ओळख आहे. दरम्यान, या क्लिपमुळे त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...