आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकानपूर - शहराचे पोलिस अधीक्षक सुरेंद्र दास यांनी बुधवारी सकाळी विष खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना अत्यंत गंभीर स्थितीत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 2014 बॅचचे आयपीएस सुरेंद्र दास बलियाचे राहणारे आहेत. गेल्या महिन्यातच त्यांची कानपूर येथे ट्रान्सफर झाली. त्यांच्या पत्नी डॉक्टर असून त्या कानपूरच्या जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजमधून एमडी करत आहेत. त्यांचे कुटुंब लखनऊमध्ये राहते.
व्हेंटीलेटरवर आहेत सुरेंद्र दास
हॉस्पिटलमधील डॉक्टर राजेश अग्रवाल यांनी सांगितले की, बुधवारी सकाळी त्यांना हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. जेव्हा त्यांना तपासले तेव्हा त्यांची पल्स कामकरत नव्हती. ब्लड प्रेशरही रेकॉर्डेबल नव्हते. त्यांची अवस्था पाहून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यांची परिस्थिती सध्या गंभीर आहे. डॉ. राजेश यांनी सांगितले की, त्यांनी काय खाल्ले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण आम्ही विषारी पदार्थ खाल्ल्यानंतरची ट्रिटमेंट सुरू केली आहे.
कौटुंबीक वादाचे कारण
सुरेंद्र दास यांना पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलेलेले पोलिस अदिकारी संजीव सुमन म्हणाले की, त्यांची अवस्था गंभीर आहे. त्यांनी म्हटले की, आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार ते कौटुंबीक वादांमुळे तणावात होते. अद्याप एकही सुसाइड नोट मिलाल्याची माहिती नाही. सुरेंद्र यांनी सकाळी 4 वाजेच्या सुमारास वीष खाल्ल्याची माहिती समोर येतेय.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.