Home | National | Other State | IPS Surendra Das Died after 4 days in Kanpur

या IPS ने 4 दिवस मृत्यूशी दिली झुंज, सुसाइड नोटमध्ये जे लिहिले ते जगजाहीर करता येणार नाही

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 10, 2018, 12:03 AM IST

आयपीएस सुरेंद्र दास 4 दिवस जीवन-मृत्यूशी संघर्ष करत होते, परंतु रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

  • IPS Surendra Das Died after 4 days in Kanpur

    कानपूर - आयपीएस सुरेंद्र दास 4 दिवस जीवन-मृत्यूशी संघर्ष करत होते, परंतु रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. आयपीएस सुरेंद्र दास यांनी 12 वाजून 19 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. कुटुंबीयांचे रडून-रडून हाल झाले आहेत. आत्महत्येआधी त्यांनी 7 ओळींची एक सुसाइड नोटही लिहिली होती. ज्यात घरगुती भांडणांना कंटाळल्याचा उल्लेख होता.

    हृदय देत नव्हते साथ
    रिजेंसी हॉस्पिटलचे सीएमएस राजेश अग्रवाल यांच्या मते, सुरेंद्र दास यांची हृदयक्रिया सकाळपासून व्यवस्थित होत नव्हती. दुपारपर्यंत हृदयाची धडधड सुरू होती, शेवटी दुपारी 12 वाजून 19 मिनिटांनी हृदयक्रिया बंद पडून त्यांचा मृत्यू झाला.


    शरीराचे अनेक अवयव झाले निकामी
    विषाच्या प्रभावामुळे सुरेंद्र दास यांचा मेंदू, किडनी, लिव्हर डॅमेज झाले होते. डाव्या पायात रक्ताच्या गुठळ्या झाल्या होत्या. डॉक्टरांच्या पॅनलने शनिवारी त्यांच्या पायाचे ऑपरेशन करून रक्ताच्या गुठळ्या काढून टाकल्या होत्या. यानंतरही त्यांच्या शरीरात रक्ताभिसरण होत नव्हते. रविवारी त्यांची प्रकृती आणखीनच खालावली आणि यानंतर त्यांचा मृत्यू झाला.


    गत बुधवारी कौटुंबिक वादामुळे खाल्ले होते विष
    2014 बॅचचे आयपीएस सुरेंद्र दास यांनी मागच्या बुधवारी सकाळी 4 वाजता विष प्राशन केले होते. त्यांचे दोन्ही मोबाइलही फुटलेले आढळले होते. सोबतच एक सुसाइड नोटही आढळली होती. ती हस्ताक्षर तज्ज्ञाकडे पाठवण्यात आली आहे. चौकशीत कळले की, मागच्या एका आठवड्यापासून ते त्रस्त होते. इंटरनेटवर सुसाइड करण्याच्या पद्धती सर्च करत होते. वास्तविक, ते कौटुंबिक भांडणांमुळे परेशान होते. त्यांची पत्नी डॉक्टर आहे.

    सुसाइड नोटमध्ये लिहिले दु:ख
    - 7 ओळींच्या सुसाइड नोटमध्ये सुरेंद्र दास यांनी लिहिले, मी विष प्राशन करण्यात कुणाचाच दोष नाही. दररोजच्या छोट्या-छोट्या गोष्टींवरून घरगुती भांडणांमुळे परेशान होऊन मी हे पाऊल उचलत आहे.
    - सोबत सुसाइड नोटमध्ये रविना आय लव्ह यू असेही लिहिलेले आहे. पोलिसांच्या मते, आणखी काही बाबीसुद्धा सुसाइड नोटमध्ये आहेत, परंतु त्या जगजाहीर करता येणार नाहीत.

    पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos..

  • IPS Surendra Das Died after 4 days in Kanpur
  • IPS Surendra Das Died after 4 days in Kanpur

Trending