आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPSने लाल पेनाने लिहिली होती सुसाइड नोट, म्हणाला- I Love U...मला प्रत्येक गोष्टीसाठी माफ कर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपुर. आयपीएस सुरेंद्र दास यांच्या निधनानंतर सुसाइड नोट समोर आली. यामुळे आत्महत्मत्येचे कारण खुप किचकट बनले आहे. यामध्ये त्यांनी कुणालाही जबाबदार ठरवलेले नाही. परंतू पुर्ण घटनाक्रमात घरगुती वाद असल्याचे समोर आले. चार दिवस आयुष्याशी झुंज देत असताना रविवारी त्यांचे निधन झाले. आयपीएसच्या सुसाइड नोटमागे अनेक रहस्य लपलेले आहेत, जे तपासाचा विषय बनले आहेत. सध्या पत्नी डॉ. रवीना आणि माहेरचे लोक काहीच बोलण्यास तयार नाहीत.


सुसाइड नोटमध्ये काय लिहिले आहे?
- मृत्यूला कवटाळण्यापुर्वी आयपीएस सुरेंद्र दासने एक सुसाइड नोट लिहिली होती- 'डियर रवीना,(पत्नी) आय अॅम नॉट लायर. जे रेकॉर्ड केले होते ते तुझ्या आईला पाठवण्यासाठी केले होते.'
- 'नंतर वाटले की, पाठवू नये. काही लपवायचे असते, तर मोबाइल असाच सोडला नसता. मला आत्महत्येचे विचार येत होते, यामुळे मी शांत होतो. मी खरंच तुझ्यावर प्रेम करतो. तु विजय, चंद्रभानला विचारु शकते.'
- 'मी उंदीर मारण्याचे औषध आणायचे सांगितले होते, काही दिवसांपुर्वी ब्लेडही मागवली होती. मी तुझ्याविरुध्द प्लानिंग केलेली नाही. मी आत्महत्या करण्यासाठी गूगलवर सर्च केले. आय लव्ह यू, सॉरी फॉर एव्हरीथिंग'

 

लाल पेनाने लिहिली होती सुसाइड नोट 
- 2014 बॅचच्या आयपीएस सुरेंद्र दासने गेल्या बुधवारी सकाळी 4 वाजता विष घेतले होते. तब्येत बिघडल्यामुळे आणि रक्ताच्या उलट्या झाल्यामुळे त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
- विषामुळे सुरेंद्र दास यांचे ब्रेन, किडनी, लिव्हर, डॅमेज झाले होते आणि डाव्या पायात रक्त जमा झाले होते. डॉक्टरांच्या पॅनलने शनिवारी त्यांच्या पायाचे ऑपरेशन करुन जमा झालेले रक्त काढले होते.
- यानंतरही त्यांच्या शरीरात योग्य प्रकारे रक्तप्रवाह होत नव्हता. रविवारी त्यांची तब्येत बिघडली आणि यानंतर त्याचे निधन झाले.

बातम्या आणखी आहेत...