आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPS सुरेंद्र सुसाइड केस मध्ये मैत्रिणीची एंट्री, तिला सर्व माहिती होते! क्लासमेट सोडवणार ही मिस्ट्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - दिवंगत IPS सुरेंद्र दास सुसाईड केसचा गुंता अद्याप कायम आहे. दास यांचे कुटुंबीय आणि सासरचे एकमेकांना दोषी आणि आत्महत्येस कारणीभूत ठरवत आहेत. याच कारणामुळे पोलिसही कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र आहे. पण आता या प्रकरणी सुरेंद्र यांच्या एका मैत्रिणीच्या एंट्रीमुळे पोलिसांना गुंता सोडवण्याच्या दिशेने आशेचा किरण दिसत आहे. आयपीएस सुरेंद्र यानी सुसाइड नोटमध्ये एका मैत्रिणीचा उल्लेख केला होता. आता या प्रकरणाची चौकशी सुरेंद्र यांचे 2014 च्या बॅचचे आयपीएस आणि सुरेंद्र यांचे वर्गमित्र संजीव सुमन यांच्याकडे सोपवली आहे. त्यांनी तपासासाठी तीन पथकांचती नियुक्ती केली आहे. 


सील केलेल्या रुमची पुन्हा तपासणी 
- पोलिसांनी सील केलेल्या आयपीएस सुरेंद्र यांच्या सरकारी रूमची पोलिस पुन्हा झडती घेणार आहेत. पोलिसांना काहीतरी धागादोरा मिळण्याची आशा आहे. त्याचबरोबर सुरेंद्र यांच्या मैत्रिणीचीही चौकशी केली जाणार आहे. सुरेंद्र यांनी आत्महत्येपूर्वी कोणाकडे कारणाचा उल्लेख केला होता का याचीही माहिती घेतली जाईल. मोबाईलचे कॉल डिटेल्सदेखिल पुन्हा मागवले जात आहेत. एक टीम सुरेंद्र यांची आधी पोस्टींग असलेल्या सहारनपूरलाही जाणार असून तेथील त्यांच्या सहकाऱ्यांकडूनही माहिती घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 


दाखल होऊ शकतो FIR 
या प्रकरणी अद्याप एफआयआर दाखल झालेला नाही. सुरेंद्र यांच्या मोठ्या भावाने तक्रार दाखल केली आहे. तर सासऱ्यांनी पोलिस महासंचालकांना विनंती पत्र दिले आहे. दोन्ही पक्षांनी चौकशीच्या आधारे एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत प्रकरण दाबले होते, पण सासरच्या मंडळींनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर पोलिस अॅक्टीव्ह झाल्याचे सांगितले जात आहे. आयपीएस सुरेंद्र दास यांनी 5 सप्टेंबरला सुसाइड केले होते. चार दिवसांनंतर रुगणालयात त्यांचा मृत्यू झाला होता.


सुरेंद्र दास यांच्या सासऱ्यांचे आरोप.. 
- सुरेंद्र यांच्या सासऱ्यांच्या मते, सुरेंद्र यांचे कुटुंब त्यांना पैसे कमावण्याची मशीन समजत होते. त्यांनी सुरेंद्रचे अेक कॉल रेकॉर्डींगही जारी केली. 
- सुरेंद्रनेच रवीनाला हे कॉल रेकॉर्डींग दिल्याचे सासरे म्हणाले. या रेकॉर्डींगमध्ये दावा करण्यात आला आहे की, कुटुंबातील लोक नेहमी सुरेंद्रकडे पैशाची मागणी करायचे. त्यामुळे ते तणावात होते. 
- ते म्हणाले की, रवीनापूर्वी सुरेंद्रचे लग्न मोनिका नावाच्या मुलीशी ठरले होते. काही विधीही झाले होते. पण मोठा भाऊ नरेंद्र, वहिणी नेहा आणि आई इंदुवती यांच्या दबावामुळे ते नाते तुटले. पण मोनिकाकडून देण्यात आलेली रक्कम आणि भेटवस्तू नरेंद्रने ठेवून घेतल्या होत्या. मागूनही परत दिल्या नाही. 
- रविनाचे लग्न मॅट्रिमोनियल वेबसाईटद्वारे ठरले होते. सुरेंद्रला रविना आवडली होती. पण घरचे लोक तयार नव्हते. पण नंतर सुरेंद्रने नंतर त्या सर्वांना तयार केले. त्यानंतर मोठा भाऊ आणि वहिणीच्या मर्जी विरोधात 9 एप्रिल 2017 ला लखनऊच्या एका हॉटेलमध्ये लग्न झाले. 
- सासरे म्हणाले की, सुरेंद्रच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी त्याला काहीही मदत केली नव्हती. उलट रवीना गिफ्ट करण्यासाठी सुरेंद्रनेच भावाला गिफ्ट खरेदी करून दिले होते. त्याचे रेकॉर्डींगही त्यांच्याकडे आहे.

बातम्या आणखी आहेत...