आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीएचएफएलच्या 12 ठिकाणांवर ईडीचे छापे, इकबाल मिरची प्रकरणात चौकशी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) दीवान हाउसिंग फायनांस कॉर्पोरेशन लिमिटेड (डीएचएफएल) आणि त्याच्याशी संबंधित 12 ठिकाणांवर शनिवारी धाड टाकल्या. आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमचा सहकारी इकबाल मिरची विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा तपास करताना ही चौकशी केली जात आहे.

ईडी सनब्लिंक रिअल एस्टेट कंपनीकडून इकबाल मिरचीच्या व्यवहारांची चौकशी करत आहे. डीएचएफएलने सनब्लिंकला 2,186 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. ईडीला संशय आहे, की ही रक्कम सनब्लिंकच्या माध्यमातून मिरची आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या खात्यात जमा झाली होती. डीएचएफएलने हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, मनी लॉन्ड्रिंगच्या पुराव्यांचा सध्या शोध घेतला जात आहे. ईडीने मिरची कुटुंबाशी मालमत्ता सौद्यांचे आरोप लावताना राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची सुद्धा शुक्रवारी चौकशी केली होती. पटेलांनी आपल्यावर लावलेले सर्वच आरोप फेटाळून लावले. उल्लेखनीय बाब म्हणजे, 2013 मध्ये मिरचीचा लंडनमध्ये मृत्यू झाला. तो अमली पदार्थ तस्करी आणि खंडणी प्रकरणात दाऊदचा जवळचा मानला जात होता.

बातम्या आणखी आहेत...