आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Iran Attacks Two US Bases, Claim Of Killing 80 US Troops; Ukraine Planes Crash, Two Major Earthquake Strikes

दोन अमेरिकी तळांवर इराणचा हल्ला; 80 अमेरिकी सैनिक मारल्याचा दावा, युक्रेनचे विमान कोसळले, भूकंपाचे दोन मोठे हादरे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • क्षेपणास्त्राच्या हल्ल्यामुळेच विमान कोसळल्याची शंका, 176 ठार
  • जनरल सुलेमानींच्या हत्येचा बदला; ट्रम्प म्हणतात, 'ऑल इज वेल' ; 'ही तर चपराक' - खोमेनी

​​​​​​बगदाद/ तेहरान/ वॉशिंग्टन : इराणमध्ये बुधवार अत्यंत घडामोडींचा दिवस ठरला. इराणने आपले लष्करी अधिकारी जनरल कासिम सुलेमानी यांच्या दफनविधीनंतर काही तासांतच अमेरिकेशी हिशेब चुकता करण्यासाठी इराकमधील दोन अमेरिकी तळांवर २२ क्षेपणास्त्रे डागली. यानंतर काही वेळात राजधानी तेहरानमध्ये युक्रेनचे एक विमान कोसळले. यात ९ क्रूंसह १७६ लोक मृत्युमुखी पडले. यानंतर काही तासांत इराणमध्ये भूकंपाचे दोन मोठे हादरेही बसले. दरम्यान, अमेरिकेने सुलेमानींवर हल्ल्यासाठी जी वेळ निवडली अगदी त्याच वेळी म्हणजे शुक्रवारी रात्री दीड वाजता इराणने हे हल्ले केले.

इराणने इराकच्या अनबार प्रांतात अमेरिकी हवाईदलाच्या तळांवर तसेच इरबिल तळावर बुधवारी पहाटे २२ क्षेपणास्त्रे डागली. हल्ल्यात ८० अमेरिकी सैनिक मारले गेल्याचा दावा इराणने केला. सुलेमानी त्यांच्या हत्येचा बदला म्हणून अमेरिकी तळांवर हल्ले केल्याचे इराणने म्हटले आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑल इज वेल' असे ट्विट करत एकही सैनिक मारला गेला नसल्याचे म्हटले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी हा अमेरिकेला हादरा असल्याचे म्हटले आहे.

विमान पडण्यापूर्वीच त्याच्या ठिकऱ्या...

युक्रेनचे इराणमध्ये कोसळलेल्या विमानाच्या आकाशात ठिकऱ्या उडाल्या असल्याने विमानावर क्षेपणास्त्र हल्ला झाल्याची शंका व्यक्त होत आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स देण्यास इराणने नकार दिला.

आखातात प्रवास टाळा : दरम्यान, इराण-अमेरिकेतील तणाव पाहता भारतीयांनी इराणचा किंवा आखातातील देशांत प्रवास टाळावा, अशी सूचना भारत सरकारने केल्या आहेत.

इराण-अमेरिका तणावानंतर जगभर परिणाम

1 भारताने आपल्या देशातील विमान कंपन्यांना इराण, इराकसह आखाती देशांच्या आकाशातून जाणारे मार्ग टाळा, अशी सूचना केली.
2 दोन्ही देशांतील तणावामुळे सोने वधारले. दिल्लीत ५३० रुपयांनी वाढून ४२,३३० रुपयांवर. चांदीही ७६० रुपयांनी वाढून विक्रमी ४९,५६० रुपयांवर.
3 कच्चे इंधन तेल ४.५ टक्क्यांनी महागले. दर ७१ डॉलर प्रती बॅरलवर. आखातातच युद्धाचा हा भडका उडाल्याने पुन्हा एकदा जगभर इंधन तेलाचे दर वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे अनेक अर्थव्यवस्था अडचणीत येऊ शकतात.

रिव्होल्युशनरी गार्ड््सचा दावा

आइन अल-असद हवाईतळावरून १५ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. यातील एकही अमेरिकी रडार पकडू शकले नाही. यात अमेरिकी हेलिकॉप्टर व साहित्य नष्ट झाल्याचा दावा इराणचे लष्कर रिव्होल्युशनरी गार्ड््सने केला. अमेरिका व मित्रपक्षांचे असे १४० तळ लक्ष्य असल्याचेही या लष्कराने म्हटले आहे. दरम्यान, अमेरिकी संरक्षण विभागाने इराणच्या या हल्ल्याला पुष्टी दिली आहे. नुकसानीचा अंदाज काढला जात असल्याचे पेंटागॉनने म्हटले आहे .
 

बातम्या आणखी आहेत...