आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Iran Attacks US Military Bases In Iraq In Retaliation, Claims 80 Dead, All Is Well Says US President Donald Trump

अमेरिकन तळांवर 15 मिसाइल हल्ले, 80 'अमेरिकन दहशतवादी' मारल्याचा इराणी माध्यमांचा दावा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेच्या लष्कराला दहशतवादी घोषित केल्याच्या दुस-याच दिवशी हल्ला
  • डोनाल्ड ट्रम्प म्हणाले- ऑल इज वेल, उद्या सकाळी यावर प्रतिक्रिया देईन!

वॉशिंगटन / तेहरान / बगदाद - इराणने इराकमध्ये तैनात असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळावर बुधवारी भल्या पहाटे मिसाइल हल्ले केले. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, इराणने पहाटे साडे तीनच्या सुमारास एकानंतर एक 15 मिसाइल डागल्या आहेत. त्याचा व्हिडिओ सुद्धा आता समोर आला आहे. इराकच्या अनबर प्रांतात ऐन अल-असद आणि इरबिलमध्ये एका ग्रीन झोनवर असलेल्या अमेरिकन लष्कराच्या तळांना यात लक्ष्य करण्यात आले आहे. या हल्ल्यामध्ये किमान 80 जण मारल्याचा दावा इराणकडून केला जात आहे. इराणी मीडियाने मारल्या गेलेल्या कथित अमेरिकन सैनिकांना अमेरिकन दहशतवादी असे म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...