आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणने सर्व शहरांत सीमा केल्या बंद, समस्येला गांभीर्याने घ्या : डब्ल्यूएचआे

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
छायाचित्र मिलानच्या पियाजा डेल डुआेमोचे आहे. येथे ९० लाख पर्यटक नेहमी भेट देत असत. - Divya Marathi
छायाचित्र मिलानच्या पियाजा डेल डुआेमोचे आहे. येथे ९० लाख पर्यटक नेहमी भेट देत असत.

तेहरान / वॉशिंग्टन - इराणमध्ये कोरोना विषाणूमुळे १२४ जणांचा मृृत्यू झाला, तर ४ हजार ७४७ जणांना संसर्ग झाल्याची पुष्टी देण्यात आली आहे. त्यामुळे इराणने सर्व शहरांच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील लोकांची वाहतूक रोखण्यासाठी आता इराणने बळाचा वापर सुरू केला आहे. सर्व देशांनी या संकटाला गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे. हे काही ड्रिल चाललेले नाही, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला. 

- अमेरिकेच्या संसदेने कोरोनाशी लढण्यासाठी ५७ हजार कोटी रुपयांच्या आणीबाणी विधेयकाला मंजुरी दिली. सिनेटमध्ये दोन्ही पक्षांनी त्यास पाठिंबा दिला. 
- दक्षिण कोरियात शुक्रवारी कोरोना व्हायरसची ५१८ नवीन प्रकरणे आढळून आली. त्यामुळे बाधितांची संख्या ६ हजार २८४ वर पोहोचली आहे. 
- भारतात अटारी-वाघा सीमेवर बिटींग द रिट्रीट सेरेमनीमध्ये दर्शकांना प्रवेश बंद करण्यात आला. आता हा सेरेमनी दर्शकांविना होणार आहे. 

इशारा : पुढल्या वर्षी कोरोना पुन्हा येणार?
पेन्टागॉनमध्ये कोरोना व्हायरसवर एका जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान अमेरिकेचे वाल्टर रीड आर्मी इन्स्टिट्यूटचे सेंटर फॉर इन्फेक्शियस डिजिजचे प्रमुख डॉक्टर नेल्सन मायकलने हा इशारा दिला आहे. डॉक्टर नेल्सन व त्यांच्या टीमच्या म्हणण्यानुसार  पुढील महिन्यात संसर्ग कमी झाला तरी पुढील थंडीच्या लाटेच्या काळात जगाला पुन्हा त्याच्याशी सामना करण्यास सज्ज व्हावे लागेल. 

जगातील ऐतिहासिक पर्यटनस्थळांना पर्यटकांची पाठ, पर्यटन उद्योगाला १.५८ लाख कोटींचा फटका 
कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या भीतीने जगभरात चर्चित ऐतिहासिक पर्यटन स्थळ व धार्मिक महत्त्व असलेल्या ठिकाणी शुकशुकाट आहे. चीन, जपान, इटली, दक्षिण कोरियाने वाहतुकीची साधने बंद केली आहेत. चीनमध्ये तर नवीन वर्षातही पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या यंदा घटली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या इशाऱ्यानंतर लोकांनी इतर देशांचा प्रवास रद्द केला आहे. २०१९ मध्ये जागतिक पर्यटन उद्योगाची उलाढाल सुमारे १.७ ट्रिलियन डॉलरचा होता. परंतु, कोरोनाच्या संसर्गामुळे पर्यटन उद्योगाला १.५८ लाख कोटींहून जास्तीचा फटका बसला. कोरोनामुळे अमेरिकेच्या पर्यटन उद्योगाला चार वर्षांसाठी ७१ हजार कोटी रुपयांची हानी सोसावी लागेल. 

बातम्या आणखी आहेत...