आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Iran Has The Highest Number Of Deaths In A Single Day, Increasing The Number Of Victims In 24 Hours

इराणमध्ये एकाच दिवसात सर्वाधिक ४९ जणांचा मृत्यू, गेल्या चाेवीस तासांत संसर्गामुळे बळींच्या संख्येत वाढ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेहरान - इराणमध्ये गेल्या चाेवीस तासांत काेराेनाच्या संसर्गामुळे एकाच दिवसात ४९ जणांचा मृत्यू झाला. नाेव्हेल काेराेनामुळे एवढ्या माेठ्या संख्येने मृत्युमुखी पडलेल्यांची ही इराणमधील माेठी घटना मानली जाते.इराणच्या आराेग्य मंत्र्यांनी ही माहिती जाहीर केली. फेब्रुवारीच्या मध्यावर काेराेनाची बाधा झाल्याने इराणमध्ये मृतांची संख्या झपाट्याने वाढत हाेती. काेराेनामुळे १९४ जणांचा मृत्यू झाला. काेराेना संसर्गाची सुरुवात झालेल्या चीननंतर परदेशात सर्वाधिक मृत्यू संख्या इराणमध्ये असल्याचे सांगितले जाते. इराणमधील ३१ प्रांतांत काेराेनाची बाधा झालेल्यांची संख्या ६ हजार ५६६ वर पाेहाेचली आहे. दुसरीकडे इटलीत १.६ काेटी लाेकांना स्वतंत्र ठेवण्याची कवायत सुरू करण्यात आली आहे. सरकारने गेल्या आठवड्यात सर्व शाळा, महाविद्यालयांना १० दिवसांची सुटी देण्यात येत असल्याचे जाहीर केले हाेते. पंतप्रधान गियुसेपे काेंटी यांनी काेराेनावर नियंत्रण मिळवण्यासाठी खासगी तसेच सार्वजनिक ठिकाणी हाेणारे आयाेजन स्थगित करण्याचे आदेश दिले हाेते. सरकारने या आदेशाची तीन एप्रिलपर्यंत लागू करण्यात यावे, असेही स्पष्ट केले हाेते. युराेपात काेराेना व्हायरसचे सर्वाधिक प्रकरणे इटलीत आहेत. शनिवारपर्यंत संसर्ग झालेल्यांची संख्या ४ हजार ६३६ वर पाेहाेचली आहे, तर मृतांची संख्या २३०हून जास्त झाली आहे. इटलीत गेल्या २४ ताासंत काेराेनामुळे ५० हून जास्त लाेकांचा मृत्यू झाला. 


चीननंतरचे सर्वाधिक संसर्ग झालेले देश व मृतांची संख्या
 :


दक्षिण काेरिया- ४८ मृत्यू, इटली- २३३ मृत्यू,  इराण- १४५ मृत्यू, फ्रान्स- १६ मृत्यू. अमेरिका-कॅनडा- १६ मृत्यू, मध्य-पूर्व- १४९ मृत्यू ९५ देशांत ३ हजार ५९५ दगावले, बाधितांची संख्या १ लाख ५ हजार ८३६


काेराेना विषाणूच्या संसर्गामुळे जगातील ९५ देशांत ३ हजार ५९५ जणांचा मृत्यू झाला. जगभरातील बाधितांची संख्या रविवारी १ लाख ५ हजार ८३६ झाली आहे. शनिवारी ९३३ नवीन प्रकरणे समाेर आली आहेत. चीन, हाँगकाँग, मकाऊ या भागांतील संसर्गाचा आकडा ३ हजार ९७ वर पाेहाेचला आहे. चीनबाहेरील संसर्गाची संख्या २५ हजार १४१ एवढी झाली आहे. चीनबाहेर रविवारपर्यंत मृतांची संख्या ४९८ झाली आहे.