आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या देशात बाप आपल्या दत्तक मुलीसोबत करू शकतो विवाह; संसदेने मंजूर केला कायदा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • येथे अवघ्या 13 वर्षांच्या दत्तक मुलीसोबत बाप करू शकतो विवाह

न्यूज डेस्क - इराणच्या संसदेने नुकताच एक असा कायदा मंजूर केला की जगभरात त्याची चर्चा सुरू आहे. नवीन कायद्यानुसार, एक बाप आपल्या भरण-पोषण केलेल्या मुलीसोबत निकाह करू शकतो. अट एवढीच की ती दत्तक घेतलेली असावी. त्यातही घृणास्पद म्हणजे, मुलीचे वय 13 वर्षांचे असले तरीही तिच्यासोबत विवाह केला जाऊ शकतो. इराणमध्ये 22 सप्टेंबर रोजी बहुमताने या कायद्याला मंजुरी देण्यात आली आहे.

प्रसिद्ध ब्रिटिश पोर्टल द गार्डियनच्या वृत्तानुसार, हा कायदा मंजूर होताच अनेक सामाजिक संस्थांनी त्याचा विरोध सुरू केला आहे. लंडनमध्ये राहणाऱ्या जस्टीस फॉर ईरान ग्रुपच्या मानवाधिकार वकील शदी सद्र यांनी या कायद्याला बाल लैंगिक शोषण म्हटले आहे. इंग्रजी याला पेडोफिलिया असेही म्हटले जाते. दत्तक घेतलेल्या मुलीसोबत बापाने विवाह करणे हा इराणच्या संस्कृतीचा भाग नाही. या कायद्यामुळे देशात बाल लैंगिक शोषणाचे प्रमाण वाढेल. हा कायदा अल्पवयीन मुलीवर वडिलाने बलात्कार करण्याची मंजुरी देणारा ठरेल.

इराणमध्ये अजुनही दत्तक घेतलेल्या मुलींना आपल्या वडिलांसमोर आणि दत्तक घेतलेल्या मुलींसमोर मातांना हिजाब वापरावा लागतो. त्यामध्ये सुधारणा करण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा इराण प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु, नवीन कायदा केवळ इराणची संस्कृतीच नव्हे, तर इस्लाम आणि मानवाधिकार विरोधी आहे. इराणच्या संसदेने यास मंजुरी दिली तरी सर्वोच्च संस्था गार्जियन काउंसिल यास मंजुरी देणार नाही असे मत सद्र यांनी मांडले आहे. इराणमध्ये मुला-मुलींचे बाल विवाह केले जातात. यात मुलींचा विवाह 13 वर्षांची असताना तर मुलांचे वय 15 वर्षांचे असतानाही लावला जातो.