आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Plane Crash: रनवेवरून घसरले इराणचे मालवाहू लष्करी विमान; 15 जणांचा मृत्यू, केवळ एक जण वाचला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेहराण - इराणी लष्कराचे मालवाहू विमान बोइंग 707 हवाईपट्टीवरून घसरल्याने भीषण अपघात झाला. यात 16 जण प्रवास करत होते. त्यापैकी 15 जणांचा मृत्यू झाला असून केवळ एक जिवंत आहे. ही दुर्घटना सोमवारी इराणच्या राजधानीजवळ घडल्याची माहिती लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जारी केली. विमान अपघातात जिवंत वाचलेला एक अभियंता असून त्याला उपचारासाठी रुगणालयात दाखल करण्यात आले आहे.

 

कार्गो विमानातून किर्गिझतान येथून मांस आणले जात होते. त्याच दरम्यान सोमवारी विमानाची फाथ विमानतळावर आपातकालीन लॅन्डिंग करण्यात आली. परंतु, विमान हवाईपट्टीवर थांबलेच नाही आणि हा अपघात घडला आहे. विमानाला अचानक आग लागली आणि जळून खाक झाले. या विमानात एकूणच 16 जण प्रवास करत होते. परंतु, एक अभियंता वगळता कुणीही वाचलेले नाही. तो सुद्धा जखमी असून त्याला उपचारासाठी तातडीने रुगणालयात दाखल करण्यात आले आहे. किर्गिझतानच्या स्थानिक माध्यमाने हे विमान इराणचे होते असे सांगितले आहे. तर इराणच्या माध्यमांनी ते किर्गिझतानचेच असल्याचा दावा केला आहे.

बातम्या आणखी आहेत...