आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातेहरान - इराणच्या राजधानीत बुधवारी सकाळी बोइंग 737 विमान उड्डान घेतल्यानंतर 3 मिनिटांत कोसळले. विमानात 176 जण प्रवास करत होते त्या सर्वांचाच मृत्यू झाला आहे. इराणच्या फार्स न्यूज एजन्सीनुसार युक्रेन एअरलाईन्सचे हे विमान तेहरानवरून युक्रेनच्या कीव्ह जाणार होते. परंतु, ऐनवेळी काही तांत्रिक बिघाड आल्याने ही दुर्घटना घडली.
फ्लाईट रडार 24 वेबसाईटने एअरपोर्टच्या आकडेवारीचा आधारे सांगितले, की युक्रेनचे बोईंग 737-800 विमान स्थानिक वेळेनुसार सकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी उड्डाण करणार होते. परंतु विमानाने 6 वाजून 12 मिनिटांनी उड्डाण केले. उड्डाण घेताच काही वेळाने फ्लाईटने डेटा पाठवणे बंद केले. एअरलाईन्सने या बाबतीत अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेले नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.