आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरामकोवरील ड्राेन हल्ल्यामागे इराणचा हात; आराेप बिनबुडाचा, इराणने अमेरिकेला फटकारले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेहरान - साैदीतील तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर झालेल्या ड्राेन हल्ल्यामागे इराणचा हात असल्याचा आराेप अमेरिकेने केला आहे. हा आराेप बिनबुडाचा आहे. असे आराेप निरर्थक व निष्फळ आहेत. त्यातून काहीही साध्य हाेणार नाही, असे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अब्बास माैसवी यांनी म्हटले आहे. शनिवारी झालेल्या दाेन प्रकल्पांवरील ड्राेन हल्ल्यानंतर अमेरिकेचे गृहमंत्री माइक पॉम्पियो यांनी इराणवर टीकास्त्र सोडले होते. हे दोन्ही प्रकल्प सौदी अरेबियाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण सौदीच्या एकूण तेल उत्पादनापैकी निम्मे उत्पादन या दोन प्रकल्पातून केले जाते. हा हल्ला हौथी बंडखोरांनी केल्याचा दावा करण्यात आला होता. त्यावर पॉम्पिआे यांनी हा हल्ला येमेनमधून झाला याचा काहीही पुरावा नसल्याचेही म्हटले होते.  जगभरात तेलाचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी अमेरिका व भागीदारी देशांबरोबर विचारविनिमय करू लागले आहे. त्यातून तेल बाजारपेठेतील उपलब्धता कायम ठेवण्यास मदत होऊ शकेल, असा विश्वास अमेरिकेतील एका मुत्सद्याने ट्विट करून व्यक्त केला.  त्याचबरोबर इराणविरोधात कडक भूमिका घेण्यासाठीदेखील व्यूहरचना करावी लागणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला होता.  वास्तविक गेल्या वर्षी मे महिन्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१५ च्या करारातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले होते. तेव्हापासून अमेरिका-इराण यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. त्यानंतर अमेरिकेने इराणवर सातत्याने निर्बंध लादले. 

सौदीने ड्रोन हल्ल्याची केली चौकशी 
सौदीतील तेल शुद्धीकरण प्रकल्पांवरील हल्ल्याच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राष्ट्रीय संपत्ती, आंतरराष्ट्रीय ऊर्जा सुरक्षा व जागतिक अर्थव्यवस्थेचे स्थैर्य निश्चित करण्यासाठी व अशा प्रकारच्या दहशतवादी संकटाचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा विकसित करून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. हौथी बंडखोरांकडून असे हल्ले केले जात आहेत. परंतु अशा हल्ल्यात बंडखोरांना यश आलेले नाही. त्यामुळे तेल प्रकल्पांची मर्यादित हानी झाल्याचे सांगण्यात येते. 

बातम्या आणखी आहेत...