आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणने UAE आणि UK चे ताब्यात घेतलेल्या 2 जहाजातील 9 भारतीयांची केली सुटका, 21 जण अद्याप ताब्यात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेहरान - इराणने गुरुवारी ब्रिटन आणि संयुक्त अरब इमिरतच्या दोन जप्त केलेल्या जहाजातून ताब्यात घेतलेल्या 30 पैकी 9 भारतीयांची सुटका केली. रिपोर्ट्सनुसार, सध्या 21 भारतीय तेथे बंदी आहेत. इराणने या महिन्याच्या सुरुवातीला आपल्या समुद्र सीमेचे उल्लंघन केलेच्या आरोपातून यूएईच्या स्टेना रियाला जप्त केले होते. यामध्ये एकूण 12 भारतीय होते. यानंतर इराणने ब्रिटनच्या स्टेना इमपारो तेल टँकरला होरमुज खाडीतून पकडले. यामध्ये 18 भारतीय क्रू सदस्य होते. एकूण 30 भारतीय इराणमध्ये कैद आहे. 

 

हे दोन जहाज ताब्यात घेतल्यापासून भारत इराणच्या रुहाणी सरकारच्या संपर्कात आहे. गुरुवारी इराणने भारतीय दुतावासाला स्टेना इमपारोकडून ताब्यात घेतेलेल्या 18 नागरिकांचे  कॉन्स्युलर अॅक्सेस दिला आहे. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधर यांनी सांगितले की सर्व भारतीय सुरक्षित आहेत. त्यांची लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. 

 

24 भारतीय आहेत ब्रिटनच्या ताब्यात 
यापूर्वी ब्रिटनच्या स्पेनच्या तटीय प्रदेशात इराणचे 'ग्रेस 1' जहाज ताब्यात घेण्यात आले होते. यामध्ये 24 भारतीय क्रू होते. परराष्ट्र मंत्रालयाच्या मते, भारतीय उच्चायुक्तांच्या एका टीमने ग्रेस 1 मधून ताब्यात घेतलेल्या नागरिकांची भेट घेतली आहे. त्यांना आपल्या कुटुंबीयांशी बोलण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे त्यांना आता कोणापासूनही भय नाही.