आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावॉशिंग्टन - इराणने गुरुवारी सकाळी अमेरिकेचे १२६० कोटी रुपये किमतीचे सर्वात शक्तिवान ड्रोन पाडले. आपल्या सीमा हद्दीत ड्रोन होते, असा इराणचा दावा होता, तर अमेरिकेने हा दावा फेटाळला आहे. यावर अमेरिकी अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी इराणने घोडचूक केली असल्याचे म्हटले, तर इराणी कमांडर हुसेन सलामी यांनी आपले लष्कर युद्धासाठी सज्ज असल्याचा इशारा दिला. जो कुणी इराणच्या हद्दीत येईल तो उद्ध्वस्त होईल, असे सलामी म्हणाले. दरम्यान, इराणने अमेरिकी ड्रोन पाडल्याने इराणच्या आखातात युद्धाचे ढग आहेत. कोणत्याही क्षणी युद्ध पेटण्याची चिन्हे आहेत.
महाशक्तिमान ड्रोन
अमेरिकेचे जे ट्रायटन ड्रोन इराणने पाडले त्याची ५६ हजार फूट उंचीवर ताशी ६०० किमी वेेगाने उडण्याची क्षमता आहे. हे ड्रोन सुमारे ५० फूट लांबीचे असून पंखांची लांबी १३० फूट आहे. इराणकडे रशियन एस-३०० ही आधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली असून यामुळे आखातात आण्विक युद्धाचा धोका असल्याची भीती माध्यमांनी व्यक्त केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.