आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Iran Should Not Even Think About Attack Again, Otherwise We Will Take Action They Never Seen Yet...': Trump

इराणने पुन्हा हल्ल्याचा विचारही करू नये, अन्यथा 'न भूताे...' अशी कारवाई करू : ट्रम्प

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुलेमानींवर रविवारी मशहदमध्ये दफनविधी झाला. त्यांच्या अंत्ययात्रेत त्यात १० लाखावर लोक सहभागी झाले होते. लोक साश्रू नयनांनी अमेरिकेचा सूड घ्यावा, अशी मागणी करत होते. - Divya Marathi
सुलेमानींवर रविवारी मशहदमध्ये दफनविधी झाला. त्यांच्या अंत्ययात्रेत त्यात १० लाखावर लोक सहभागी झाले होते. लोक साश्रू नयनांनी अमेरिकेचा सूड घ्यावा, अशी मागणी करत होते.

वाॅशिंग्टन : बगदादच्या ग्रीन झाेनमधील अमेरिकेच्या दुतावासावरील राॅकेट हल्ल्यावर राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांनी इराणला खुले आव्हान दिले आहे. पुन्हा हल्ला करू नये, असा माझा इराणला सल्ला आहे. अन्यथा पूर्वी कधीही झाली नसेल अशी कारवाई केली जाईल, अशी धमकीही ट्रम्प यांनी रविवारी दिली.

अमेरिकेने लष्करी उपकरणांवर दाेन ट्रिलियन डाॅलर खर्च केला आहे. आमच्याकडे जगातील सर्वाेत्कृष्ट व सर्वात माेठे सैन्य आहे. इराणने अमेरिकेच्या काेणत्याही लष्करी तळाला लक्ष्य केले तर आम्ही विनासंकाेच हल्ला करू. ट्रम्प म्हणाले, इराण अमेरिकेच्या काही संपत्तीला नष्ट करण्याबाबत वक्तव्ये करू लागला आहे. इस्लामिक रिव्हाेल्युशनरी गार्डचे कमांडर कासीम सुलेमानीने आपल्या जीवनात किती जणांना ठार केले, हे मला सांगण्याची गरज नाही. त्यात अलीकडेच इराणमध्ये ठार करण्यात आलेल्या आंदाेलकांचाही समावेश आहे. इराणने अमेरिकेच्या जवानांना किंवा संपत्तीवर हल्ला केल्यास अमेरिकेच्या रडावर ५२ इराणी ठिकाणे आहेत. त्यावर अतिशय वेगाने काम केले जात आहे. १९७९ मध्ये इराणने एक वर्षाहून जास्त दिवस अमेरिकेच्या राजदूत कार्यालयात ५२ लाेकांना आेलिस ठेवले हाेते. ही संख्या त्याचे द्याेतक आहे.

ट्रम्प म्हणाले- ५२ ठिकाणे रडावर; त्याचा अन्वयार्थ ऐतिहासिक

१९७८ - इराणचे अखेरचे शाह मोहंमद रजा पहलवींच्या विरोधात देशात क्रांती सुरू, ठिकठिकाणी दंगली
१९७९- शाह यांचे इराण सोडून इजिप्तला पलायन
१ फेब्रुवारी १९७९- १४ वर्षांच्या विजनवासानंतर अयातुल्ला खोमेनी इराणला परतले
२२ ऑक्टोबर १९७९- शाह पहावी उपचाराच्या बहाण्याने अमेरिका भेटीवर.
४ नोव्हेंबर १९७९ - इराणच्या विद्यार्थ्यांनी शाह यांच्या विरोधात तेहरानमध्ये अमेरिकी दूतावासावर हल्ला करून ९० जणांना आेलिस ठेवले. पैकी ६६ अमेरिकी होते.
६ नोव्हेंबर १९७९- अयातुल्ला खाेमेनींच्या नेतृत्वाखाली इराणमध्ये सरकार स्थापना.
७ नोव्हेंबर १९७९- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कार्टर यांनी आेलिसांच्या सुटकेसाठी संघ इराणला पाठवला. खाेमेनी सापडले नाहीत.
२५ एप्रिल १९८०- आेलिसांच्या सुटकेचे हेलिकॉप्टर कोसळले, ८ जण ठार
२७ जुलै १९८०- शाहचा मृत्यू झाला.
जानेवारी १९८१- इराणने ५२ आेलिसांची सुटका केली. अमेरिकेत दाखल.

इराणने म्हटले : अमेरिकी तळावर हल्ला करू

इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते खाेमेनी यांचे लष्करी सल्लागार हुसैन देहघन रविवारी म्हणाले, माझ्या देशाची प्रतिक्रिया निश्चितपणे अमेरिकेच्या लष्करी तळांच्या विरोधात असेल. आमच्या नेतृत्वाने नेहमीच युद्ध नको, अशी भूमिका मांडली. त्याचबरोबर भविष्यातही युद्ध करणार नाही. परंतु, यावेळी युद्ध अमेरिकेने सुरू केले. त्यामुळेच आम्ही त्यांना योग्य ते उत्तर देऊ. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादीमिर पुतीन व तुर्कीचे राष्ट्रपती रेसिपी तय्यप एर्दोगन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. तिन्ही नेत्यांनी सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर संयमाने वागावे.

इराणजवळ ५.२३ लाख सक्रिय सैनिक; लष्कर : २० हजारांवर नौदल खाडीत तैनात, सैनिक

इराणमध्ये ५.२३ लाख सक्रिय सैनिक आहेत. त्यात लष्कराचे ३.५ लाख व रिव्होल्युशनरी गार्ड्सचे १.५ लाख सैनिक सहभागी आहेत. त्याच दलाचे २० हजार नौदल जवानही आहेत. हे दल हॉर्म्यूझच्या खाडीत तैनात आहेत. ही तुकडी इतर लष्करी कारवायांचे नियंत्रण करते. या समूहाने इराणच्या विरोधातील अंतर्गत आवाज दडपण्याचे काम केले आहे.

क्षेपणास्त्रे : इराणच्या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात सौदी, इस्रायलसह आखाती देश

इराणकडे कमी व मध्यम पल्ल्याची अनेक क्षेपणास्त्रे आहेत. परंतु, इराणचे हवाई दल सौदी व इस्रायलच्या तुलनेत कमकुवत आहे. या कमकुवत गोष्टींची भरपाई इराणची क्षेपणास्त्रे करतील. अमेरिकी संरक्षण विभागानुसार इराणची क्षेपणास्त्र शक्ती मध्य-पूर्वेच्या देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. इराणला २०१५ मध्ये लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीला स्थगित करावे. इराणच्या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात सौदी, इस्रायलसह आखाती देशही समाविष्ट आहेत.

स्त्रोत : ब्रिटिश थिंक टँक इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडिज, स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट.

परदेशी माेहीम : ५ हजार जवान व १५ हजार एजंट्स मोहीम

कुद्स फोर्स ( सुलेमानी या दलाचे नेतृत्व करत होते) रिव्होल्युशनरी गार्ड्ससाठी परदेशात गोपनीय मोहीम चालवते. त्यात ५ हजारांहून जास्त सैनिक आहेत, तर १५ हजार एजंट्स आहेत. परंतु, आर्थिक निर्बंधामुळे इराणची शस्त्र आयात इतर आखाती देशांच्या तुलनेत कमी झाली. २००९-१८ दरम्यान इराणच्या शस्त्रांच्या आयात सौदीच्या तुलनेत ३.४ टक्के होते.