आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Iranian MP Puts 21 Cr. Bounty On President Donald Trump's Head Over General Qassem Soleimani's Killing

डोनाल्ड ट्रम्प यांना मारणाऱ्यास 21 कोटी रुपयांचे बक्षीस, जनरल सुलेमानींच्या हत्त्येमुळे नाराज इराणी खासदाराची संसदेत घोषणा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कह्नूज शहराचे खासदार अहमद हामजे म्हणाले की, इराणने आत्मरक्षासाठी परमाणु शस्त्र तयार करावे
  • अमेरिकेने 3 जानेवारीला इराणच्या कुद्स फोर्सचे कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांना मारले होते

तेहरान- इराणमधील एका खासदाराने अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मारणाऱ्यास 21 कोटी रुपये बक्षीसाठी घोषणा केली आहे. इराणमधील कह्नूज शहराचे खासदार अहमद हामजे म्हणाले की, हे बक्षीस केरमानच्या लोकांकडून असेल. केरमान तिच जागा आहे, जिथे जनरल कासिम सुलेमानी यांना दफन करण्यात आले आहे. हामजे जनरल सुलेमानींच्या मृत्यूमुळे खूप नाराज होते, त्यामुळे त्यांनी संसद (मजलिस) मध्ये भाषणादरम्यान ट्रम्प यांना मारणाऱ्यास बक्षीस देण्याची घोषणा केली.

हामजे संसदेत भाषणावेळी म्हणाले की, इराणने आत्मसुरक्षेसाठी परमाणु शस्त बनवले पाहीजे. जर आपल्याकडे परमाणू शस्त्र असतील, तर शत्रू आपल्यावर हल्ला करण्याआधी विचार करेल. 

अशी विधाने इराणचा दहशतवादी चेहरा दाखवतात- अमेरीका

यूएनमध्ये अमेरिकेचे निरस्त्रीकरण प्रकरणांचे राजदूत रॉबर्ट वुड यांनी हामजेंच्या विधानावर आक्षेप नोंदवला आहे. जिनेव्हाणध्ये माध्यमांशी बोलताना वुड म्हणाले की, "इराणकडून येणाऱ्या अशा विधानावरुन त्या देशाचा दहशथवादी चेहरा दिसतो. इराणची ही वक्तव्ये मुर्खपणाची आहेत आणि रूहानी प्रशासनाने लवकर आपला स्वभाव बदलावा."

3 जानेवारीला अमेरिकेने ड्रोन हल्ला करुन जनरल सुलेमानी यांना मारले

बगदाद एअरपोर्टवर तीन जानेवारीला अमेरिकेकडून केलेल्या ड्रोन हल्ल्यात इराणच्या इलीट कुद्स सेनेचा प्रमुख जनरल कासिम सुलेमानी यांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून इराण आणि अमेरीकेमधील तणाव वाढला आहे.

बातम्या आणखी आहेत...