आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Iranian Officials And Family Cannot Travel To The United States; New Restrictions Imposed By The Trump Government,

ईरानचे अधिकारी आणि कुटुंबीयांना अमेरीकेत जाता येणार नाही, ट्रम्प सरकारने लावले नवीन निर्बंध,

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिका आणि ईरानमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. ट्रम्प सरकारने गुरुवारी ईरानमधील सरकारी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना अमेरीकेत येण्यावर निर्बंध लावले आहेत. परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो यांनी सांगितले की, मागील अनेक वर्षांपासून ईरानी अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय अमेरिकेतील स्वातंत्र्य आणि समृद्धीचा फायदा घेत होते.



त्यांनी सांगितले की, ईरानचे अधिकारी आणि त्यांचे कुंटुबीय अमेरिकेत शिक्षण, रोजगार, मनोरंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घेत आहेत. आता तेथील कोणताच नागरिक अमेरीकेतील सुख सुविधांचा लाभ घेऊ शकणार नाही. 




अमेरिकेने ही घोषणा ईरानचे राष्ट्रपती हसन रूहानी आणि अधिकाऱ्यांना संयुक्त राष्ट्र महासभेच्या 74व्या सत्रात भाग घेण्यासाठी अस्थायी वीसा दिल्यानतंर केली. सुरुवातील हे स्पष्ट नव्हते की, ईरानच्या नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना अमेरीकेतील महासभेत येऊ दिले जाईल का नाही. पण, आता हे स्पष्ट झाले की, त्यांना महासभेत भाग घेण्यासाठी येऊ दिले जाईल. पण, नंतर कोणत्याही ईरानी अधिकाऱ्यांचा वीसा रद्द केला जाईल.