आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराह्यूस्टन- अमेरिकेने जेव्हा इराणी जनरल कासिम सुलेमानीला मारले आहे, तेव्हापासून दोन्ही देशांमद्ये तनाव वाढला आहे. यामध्येच एक चांगली बातमी आली आहे. मुळ इराणची असलेली अंतराळवीर जैस्मीन मोघबेली नासाच्या इंतराळ मिशनसाठी तयार झाली आहे. ती पहिली इराणी-अमेरिकी अंतराळवीर असेल, जी चंद्र किंवा शुक्रावर जाईल.
जैस्मीनने हेलिकॉप्टर गनशिप पायलट म्हणून अफगानिस्तानासाठी 150 मिशन पूर्ण केले आहेत. मैसाचुसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीतून एअरोनॉटिकल इंजीनिअरिंगमध्ये ग्रॅजुएट झालेली 36 वर्षीय जैस्मीनचा जन्म जर्मनीमध्ये झाला होता. 1979 मध्ये इस्लामिक क्रांतीदरम्यान त्यांचे कुटुंब इराणमध्ये गेले होते. पण नंतर मोघबेली न्यूयॉर्कमध्ये शिकली. 15 वर्षांची असताना ती एका स्पेस कँपमध्ये सामील झाली होती.
सेनेत कमीशन मिळवले
9/11 च्या 4 वर्षानंतर 2005 मध्ये मोघबेलीने सेनेत कमीशन मिळवले. तेव्हा तिचे आई-वडील मध्य-पूर्वचे असल्यामुळे घाबरले होते, पण अमेरीकी लष्करात त्यांना स्थान मिळाले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपला साथीदार सॅमसोबत लग्न केले. नासाने मोघबेलीसह 11 जणांना 18 हजार अर्जदारांमधून निवडले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.